B.Tech पास मुलीने रस्त्याच्या कडेला लावला हटके मोमो स्टॉल, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Apr 17, 2023 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

BTech Girl Selling Momos: MBA चायवाल्या नंतर आता एका B.Tech मुलीने  रस्त्याच्या कडेला फूड स्टॉल लावला आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती तिच्या कामात बऱ्यापैकी यशस्वी झालेली दिसत आहे. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

BTech girl selling momos in surat video gone viral
B.Tech पास मुलीने रस्त्याच्या कडेला लावला हटके मोमो स्टॉल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रस्त्यावरील खाद्यपदार्थांची तरूणांमध्ये मोठी क्रेझ आहे.
  • अनेक तरुणांना स्ट्रिट फूड खायला आवडतात तर काहींना हे पदार्थ तयार करायला देखील आवडतात.
  • व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या कडेला अनोख्या प्रकारचे मोमो विकताना दिसत आहे.

BTech Momos Girl:आजकाल रस्त्यावरील खाद्यपदार्थांची तरूणांमध्ये मोठी क्रेझ आहे. अनेक तरुणांना स्ट्रिट फूड खायला आवडतात तर काहींना हे पदार्थ तयार करायला देखील आवडतात. काही तरूण अभ्यास करून रस्त्याच्या कडेला स्टॉल लावतात आणि कुठल्यातरी अनोख्या पदार्थाची विक्री करताना दिसतात. MBA चायवाल्या नंतर आता एका B.Tech मुलीने  रस्त्याच्या कडेला फूड स्टॉल लावला आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती तिच्या कामात बऱ्यापैकी यशस्वी झालेली दिसत आहे. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. (BTech girl selling momos in surat video gone viral)

अधिक वाचा: 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 46 टक्के DA, पगारात किती वाढ होणार?

मुलगी मोमो विकताना दिसली

व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या कडेला अनोख्या प्रकारचे मोमो विकताना दिसत आहे. ही स्वावलंबी मुलगी आता तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे. ही मुलगी अगदी नवीन स्टाईलमध्ये मोमोज विकताना दिसत आहे. मुलीने अतिशय अनोख्या स्टाईलचे मोमोज तयार केल्याचे तुम्ही पाहू शकता. हे मोमोज चार लहान भागात विभागलेले आहेत. या भागांमध्ये, मुलगी चार वेगवेगळ्या प्रकारची चटणी घालून ग्राहकांना सर्व्ह करते. मुलीच्या मोमोजची अनोखी स्टाईल आपण पाहू शकता की मुलगी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे मोमोजच्या चारही बाजूंनी चटणी चमच्याने टाकत आहे.

अधिक वाचा: सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर !, इंग्रजी, हिंदीसह मराठीतूनही CAPF ची परीक्षा देता येणार

स्वादिष्ट मोमोज

हे मोमोज बघायला खूप सुंदर दिसतात. मोमोज वाफवल्यानंतर ती मुलगी तिच्या स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेत असल्याचे दिसते. ती व्यवस्थित स्वच्छ केलेल्या प्लेटमध्ये मोमोज सर्व्ह करताना दिसत आहे. त्याच वेळी, ती मोमोजमध्ये चटण्या खूप चांगल्या पद्धतीने टाकते. हा व्हिडिओ thehungrysurati नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एक महाविद्यालयीन तरुणी स्वादिष्ट मोमोज विकत आहे.. तुम्ही हा प्रयत्न केला आहे का?'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी