Viral Video: वळूची शिंगं पकडून काढत होता सेल्फी, प्राण्याने शिकवला चांगलाच धडा, पाहा व्हिडिओ

आपण करत असलेला स्टंट जगाला दाखवण्यासाठी हा तरुण वळूची शिंग पकडून फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वळूला त्याच्या मूळ उद्देशाबद्दल काय माहिती असणार? त्यामुळे आपल्यावर हल्ला होत असल्याची भावना झाल्याने वळूने त्याला जोरदार झटका दिला.

Viral Video
वळूची शिंगं पकडून काढत होता सेल्फी, तेवढ्यात…  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • वळूची शिंगं पकडून सेल्फी काढण्याचा तरुणाचा प्रयत्न
  • वळूने तरुणाला शिंगावर घेऊन टाकलं जमिनीवर
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video: आजकाल सेल्फी काढणं हा तरुणांचा आवडीचा प्रकार असतो. सेल्फी काढण्यासाठी अनेकजण चित्तथरारक प्रकार करतानाही दिसतात. अनेकदा तरुण सेल्फी काढण्यासाठी आपला जीवही धोक्यात घालत असल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. कधी कड्यावरून कोसळून तर कधी गच्चीच्या कठड्यावरून पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपण करत असलेला स्टंट जगाला दाखवण्यासाठी हा तरुण वळूची शिंग पकडून फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वळूला त्याच्या मूळ उद्देशाबद्दल काय माहिती असणार? आपल्यावर हल्ला होत असल्याची भावना झाल्याने वळूने त्याला जोरदार झटका दिला. 

वळूसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वळूसोबत दिसतो. वळूच्या दोन्ही शिंगांना त्याने आपल्या हातात पकडलं असून त्याला खाली वाकवण्याचा प्रयत्न तो करत आहे. वळूला आपण कसं ताब्यात ठेवलं आणि त्याच्यावर कसं नियंत्रण मिळवत वश केलं, हे दाखवण्याचा प्रयत्न तो करत आहे. आपला हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून सर्व ऑनलाईन मित्रांकडून लाईक्स मिळवण्याचा त्याचा मनसुबा होता. मात्र वळूने हा मनसुबा एका क्षणात उद्धवस्त करून टाकला. 

अधिक वाचा - Baby Borne in Mcdonald's: मॅकडोनाल्डच्या बाथरूममध्ये महिलेला प्रसूतीच्या कळा...बाथरुममध्ये झाला बाळाचा जन्म

वळूने दिली प्रतिक्रिया

समोरची व्यक्ती आपल्यावर हल्ला करते आहे किंवा त्याच्यापासून आपल्याला काही ना काही नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे, असे जेव्हा एखाद्या प्राण्याला वाटते, तेव्हा तो प्राणी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा जीव वाचवण्यासाठई मिळालेल्या निसर्गदत्त प्रेरणेतून तो आपल्यावर चाल करून येणाऱ्या घटकाला रोखण्याचा आणि हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानुसार बऱ्याच वेळापासून आपली शिंगं पकडून ठेवलेल्या तरुणाला या वळूने धडा शिकवला. जी शिंगं त्याने पकडून ठेवली होती, त्याच शिंगांवर त्याला उचललं आणि जमिनीवर आपटलं. काही क्षणांपूर्वी वळूवर वर्चस्व मिळवल्याच्या अविर्भावात सेल्फी खेचणारा तरुण पुढच्याच क्षणी जमिनीवर लोळत असल्याचं दिसलं. प्राण्यांना जर असुरक्षित वाटलं, तर ते काय करु शकतात, याची प्रचितीत या व्हिडिओतून आली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. 

अधिक वाचा - Necklace theft: गॉगल आणि मास्क लावलेल्या महिलेने सराईतपणे चोरला 10 लाखांचा हार, पाहा व्हिडिओ

प्राण्यांसोबत सेल्फी

प्राण्यांसोबत सेल्फी घेण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असा इशारा अनेकजण देत आहेत. सेल्फी घेणे ही गोष्ट आयुष्यापेक्षा आणि जीवापेक्षा मोठी नाही, ही बाब पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे, अशी चर्चाही सोशल मीडियात सुरू झाली आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी