नवी दिल्ली: Chinese Rocket Debris Videos Go Viral: चीन (China) आपल्या कुरापती थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. चीन देशातून पसरलेल्या कोरोना व्हायरससारख्या (Corona Virus) संकटाचा सामना आज संपूर्ण जग करत आहे. अजूनही कोरोनाचं संकट थांबण्याचं नाव घेत नाही. तर चीनकडून (crisis of China) वारंवार संकट निर्माण करण्याची मालिका सुरूच आहे. चीन देशाच्या कुरापतीचा सामना इतर देशांनाही करावा लागत आहे. आता कोरोनानंतर चीनच्या आणखी एका संकटामुळे भारतावर नामुष्की ओढावणार होती. 24 जुलै रोजी चीनकडून अवकाशात सोडलेलं एक रॉकेट आऊट ऑफ कंट्रोल झालं. त्यामुळे गेल्या शनिवारी ते पृथ्वीवर कोसळणार होतं. मात्र सुदैवानं हे रॉकेट (rocket) महासागरात जाऊन कोसळलं. त्यामुळे मोठी हानी होता होता वाचली.
या रॉकेटचं वजन तब्बल 23 मेट्रिक टन इतकं होतं. शनिवारी संध्याकाळी चीनच्या लाँग मार्च 5B रॉकेटचा अवशेष पृथ्वीच्या वातावरण प्रवेश करणार होता. दरम्यान वातावरणाच्या घर्षणामुळे या रॉकेटचा बहुतांश ढिगारा आधीच जळून जाणार होता. 24 रोजी चीनच्या अपूर्ण टियांगॉन्स स्पेस स्टेशनवर वेंटियन प्रयोगशाळा केबिन मॉड्यूल वितरित करण्यासाठी 25 टन वजनाचे रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले होते.
अधिक वाचा- Read Full Story In Marathi: अमेरिकेनं 'असा' केला अल-जवाहिरीचा खात्मा
यासंदर्भात सांगताना शास्त्रज्ञांनी म्हटलं होतं की, 30 जुलै रोजी या रॉकेटचा अवशेष संध्याकाळी 7.24 वाजता पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणार आहे. तसंच रविवारी सकाळी याचा काही ढिगारा कोसळण्याची शक्यता असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं होतं. पण चीनकडून सोडलेलं हे रॉकेट शनिवारी भारताच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरात कोसळलं.
यावर नासानं म्हटलं की, चीनकडून या रॉकेटसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नव्हती, ते पृथ्वीवर कुठे पडू शकतं हे देखील चीनकडून सांगण्यात आलं नव्हतं.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चिनी रॉकेटचा ढिगारा पृथ्वीच्या दिशेनं पडताना दिसत आहेत. तसंच यात कुचिंगमध्ये उल्का दिसत असल्याचंही बोलत आहेत.
meteor spotted in kuching! #jalanbako 31/7/2022 pic.twitter.com/ff8b2zI2sw — Nazri sulaiman (@nazriacai) July 30, 2022
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कसं चीनी रॉकेटचा ढिगारा कशा पद्धतीनं पृथ्वीच्या दिशेनं कोसळत आहे.