bus driver suffer a heart attack: बस चालवताना ड्रायव्हरला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही घटना मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. येथील मेट्रो बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला ह्रदयविकाराचा झटका आला. ह्रदयविकाराचा झटका आल्याने बस अनियंत्रित झाली आणि त्यामुळे रस्त्यावर जी गाडी दिसेल त्या गाडीला बसने जोरदार धडक दिली. (bus driver suffers a heart attack while driving shocking video goes viral watch it)
हे पण वाचा : हिप्सला मॉडेल सारखा शेप देण्यासाठी 6 सोप्या टिप्स
बस ड्रायव्हरला गाडी चालवताना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तर अनियंत्रित झालेल्या बसने रस्त्यावरील इतर गाड्यांना जोरदार धडक दिल्याने या अपघातात सहा जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जात आहे. हा अपघात घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सुद्धा जोरदार व्हायरल होत आहे.
JABALPUR: BUS DRIVER DIES OF HEART ATTACK — Mirror Now (@MirrorNow) December 3, 2022
In dramatic scenes caught on camera at a traffic signal in Jabalpur, a city bus ran into several vehicles after its driver died of sudden heart attack. 6 INJURED IN THE INCIDENT
#SchoolBusDriver #Heartattack
Govida reports pic.twitter.com/xIa45mhrQu
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, आधारताल येथून राणीताल येथे बस जात होती. ज्यावेळी बस दमोह नाका येथे पोहोचली तेव्हा मोठी दुर्घटना घडली. बस ड्रायव्हरला ह्रदयविकाराचा झटका आल्याने धावती बस अनियंत्रित झाली आणि समोरील अनेक वाहनांना धडक दिली.
हे पण वाचा : डिसेंबर महिन्यात 6 ग्रहांचे गोचर, या राशीच्या व्यक्तींवर होणार धनवर्षाव
पोलिसांनी सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. त्यावेळी बसमध्ये ड्रायव्हर हा मृतावस्थेत आढळून आला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कशा प्रकारे बस समोरील वाहनांना धडक देत पुढे जात आहे.