बाय डॅडी, बाय Everyone, त्यांनी ventilator काढलाय: कोविड रुग्णाने मरण्यापूर्वी वडिलांना पाठवला सेल्फी Video

COVID-19 patient sends selfie video befor dyingकोविड-१९च्या जीवघेण्या संसर्गाला बळी पडण्याच्या काहीच मिनिटे आधी हैदराबादच्या रूग्णालयातील २६ वर्षीय रुग्णाने आपले अखेरचे क्षण एका सेल्फी व्हिडिओत कैद केले आहेत.

bye daddy bye all they have  removed ventilator covid 19 patient sends selfie video to father before dying
कोविड रुग्णाने मरण्यापूर्वी वडिलांना पाठवला सेल्फी Video  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • शुक्रवारी मरण पावलेला रुग्ण रविवारी सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल झाल्यावर आला प्रकाशझोतात
  • ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी तीन तास नाकारल्याचाही मृत रुग्णाचा आरोप 
  • दरम्यान, रुग्णालय अधीक्षकांनी आरोप फेटाळले, रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला ऑक्सिजन पुरवठ्याची जाणीव झाली नसल्याचा दावा  

हैदराबाद: कोविड-१९च्या जीवघेण्या संसर्गाला बळी पडण्याच्या काहीच मिनिटे आधी हैदराबादच्या रूग्णालयातील २६ वर्षीय रुग्णाने आपले अखेरचे क्षण एका सेल्फी व्हिडिओत कैद केले आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडिओत हा तरुण रुग्णालयातील बेडवर/खाटेवर झोपलेला दिसत असून डॉक्टरांनी वेंटिलेटर काढून घेतल्याने आपण श्वास घेऊ शकत नसल्याचे तो सांगत आहे. रविवारी सदर व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. 
याचबरोबर ऑक्सिजन पुरवठ्याच्या त्याच्या मागणीकडे शेवटचे तीन तास दुर्लक्ष केल्याचा आरोपही मृत तरुणाने केला आहे. यात तो म्हणतो आहे, “त्यांनी वेंटिलेटर काढून टाकला आहे. माझं हृदय बंद पडलं आहे आणि फक्त माझी फुफ्फुसे काम करत आहेत. मला श्वास घेता येत नाहीये, बाबा. अच्छा बाबा, सगळ्यांना अच्छा, बाबा, अच्छा.”

वडिलांनी केले मुलाचे अंत्यसंस्कार

शोकसागरात बुडालेल्या या तरुणाच्या वडिलांनी आपल्या मुलावर शनिवारी अंत्यसंस्कार केले. मरण्यापूर्वी काही मिनिटेच आधी मुलाने हा व्हीडिओ आपल्याला पाठवल्याचे त्यांनी सांगितले. २४ जून रोजी तापाने फणफणल्याने इतर काही रुग्णालयांमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर सदर तरुणाला चेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, त्याला वाचवण्यात अपयश आले असून दोन दिवसांनी, २६ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. 

रुग्णालय अधीक्षकांनी आरोप फेटाळले 

वेंटिलेटर काढून घेतल्याचे आरोप फेटाळून लावत चेस्ट हॉस्पिटलचे अधीक्षक मेहबूब खान यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला ऑक्सिजन पुरवठ्याची जाणीव झाली नाही. अकस्मात हृदयघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. याचबरोबर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याचा जीव वाचवण्याचे शक्य ते सगळे प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. 

कोविड-१९संदर्भात नवे निरीक्षण 

खान यांनी पुढे सांगितले की सामान्यतः फुफ्फुसांचे कार्य थांबल्याने कोविड-१९च्या वयस्क रुग्णांचा मृत्यू होतो. परंतु कोरोनाचा विषाणू हा २५ ते ४० वयोगटातल्या रुग्णांच्या हृदयावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. ऑक्सिजन पुरवठा दिला जात असूनही या रुग्णांना तो अपूर्ण असल्यासारखे वाटते असेही त्यांनी सांगितले.    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी