Viral Video : गायीला दांडक्याने बडवत होता माणूस, वासराने शिकवला धडा, पाहा VIDEO

एक माणूस गायीला काठीने मारत होता. तेवढ्यात तिकडून एक वासरू धावत आलं आणि त्याने माणसाला चांगलाच धडा शिकवला.

Viral Video
वासराने शिकवला माणसाला धडा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • गायीला काठीने मारणाऱ्या माणसाला धडा
  • वासराने शिकवला चांगलाच धडा
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video : आपण जसं काम करतो, त्याचं तसंच फळ (Fruit of Karma) आपल्याला मिळतं, असं म्हटलं जातं. जो कुणी चांगलं काम करेल, त्याला त्याचं चांगलं फळ मिळेल आणि जो कुणी वाईट काम करेल, त्याला त्याची शिक्षा (Punishment) मिळेल, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुणाशीही वाईट वागू नये आणि वाईट विचार करू नये, असं सांगितलं जातं. आपल्या कृत्यांचे आणि विचारांचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. अनेकदा या तत्त्वज्ञानाची प्रचिती खऱ्या आयुष्यात येते आणि त्यावरील अनेकांचा विश्वास अधिकच दृढ होऊ लागतो. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओतूनही (VIral Video) हाच संदेश मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. गायींच्या गोठ्यातील हा व्हिडिओ असून गायीला काठीने मारणाऱ्या व्यक्तीला कशी शिक्षा मिळाली, हे या व्हिडिओतून दाखवण्यात आलं आहे. 

गायींना काठीचा प्रसाद

या व्हिडिओत एक व्यक्ती गायींना एका बाजूला हाकलताना दिसतो. तो गायींना एका बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातील एका गायीला तो त्याच्या हातातील काठीने एक फटका देतो. गायींनी त्याला अपेक्षित असलेल्या दिेशेने जावं आणि आपलं म्हणणं ऐकावं, या अपेक्षेने तो गायीला काठीने मारतो. मात्र त्यानंतर काही वेळातच अशी एक घटना घडते, जी पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. 

अधिक वाचा - Optical Illusion: खेळण्यांमध्ये लपला आहे खरा घुबड, शोधून दाखवा ५ सेकंदात

वासराने दिला धक्का

गायीला काठीने मारणाऱ्या व्यक्तीला काही मिनिटांतच एका वासराने धडा शिकवल्याचं हा व्हिडिओ पाहून युजर्स सांगत आहेत. गायीला काठीने मारणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने एक वासरू धावत येतं आणि जोरदार उडी मारतं. त्याच्या पायाचा धक्का व्यक्तीला लागतो आणि ती व्यक्ती खाली पडते. त्या व्यक्तीला जोरदार धक्का बसला असणार, हे तो व्हिडिओ पाहून स्पष्टपणे जाणवतं. 

अधिक वाचा - Viral Video : रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणारी महिला रातोरात झाली फेमस, या Instagram Reel ने केली कमाल

व्हिडिओ होतोय व्हायरल

जसं कर्म असेल तसंच त्याचं फळ मिळतं, अशी आपल्याकडे समजूत आहे. हा व्हिडिओ तोच संदेश देत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. गायीला काठीने मारणाऱ्या व्यक्तीला अशीच शिक्षा मिळायला हवी होती, अशी कमेंटही काहीजणांनी केली आहे. तर आपल्या कर्माचं फळ मिळायला कधीकधी वेळ लागतो, मात्र अनेकदा ते लगेचच मिळतं, हे दाखवून देणारा हा व्हिडिओ असल्याची प्रतिक्रिया काहीजणांनी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी