camels night out रस्त्यावर आले ९ उंट, पोलिसांची पळापळ

camels night out on the streets of Madrid माद्रिदच्या रस्त्यांवर पहाटे पाचच्या सुमारास ९ उंट मोकाट फिरत होते. या उंटांमुळे पोलिसांची पळापळ झाली.

camels night out on the streets of Madrid
रस्त्यावर आले ९ उंट, पोलिसांची पळापळ 
थोडं पण कामाचं
  • रस्त्यावर आले ९ उंट, पोलिसांची पळापळ
  • प्राणीमित्र संघटनेच्या कृत्यामुळे उंट रस्त्यावर आल्याची सर्कस व्यवस्थापनाची तक्रार
  • पोलीस तपास सुरू

camels night out on the streets of Madrid माद्रिद: माद्रिदच्या रस्त्यांवर पहाटे पाचच्या सुमारास ९ उंट मोकाट फिरत होते. यापैकी आठ उंट हे पाठीला दोन कुबड असलेले होते तर एक दक्षिण अमेरिकेत आढळणारा लामा उंट होता. या उंटांमुळे पोलिसांची पळापळ झाली. अखेर उंटांना हुशारीने एकत्र आणून पोलिसांनी त्या परिसराला तात्पुरता घेराव घातला. नंतर सर्कसमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने उंटांची रवानगी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी झाली.

माद्रिदमधील एका मोकळ्या जागेवर सर्कसचा तळ पडला आहे. सर्कस मालकाने यासाठी आवश्यक परवानगी मिळवली आहे. सर्कसमध्ये उंटांचा समावेश आहे. स्थानिक प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सर्कसमध्ये उंटांचा वापर करण्यास विरोध आहे. आपला विरोध प्रकट करण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी रात्रीच्या वेळी गुपचूप येऊन उंटांना जिथे ठेवले होते त्या भागातील तारांचे कुंपण तोडल्याची तक्रार सर्कसच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे नोंदवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

रस्त्यावर फिरत असलेल्या उंटांची रवानगी सर्कसच्या तळावर झाली आहे. तळावरुन पुन्हा उंट बाहेर जाऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊ असे आश्वासन सर्कसच्या व्यवस्थापनाने दिले आहे. यामुळे पोलिसांनी तक्रारीचा तपास सुरू केला आहे.

कोणालाही आंदोलनाच्या नावाखाली खासगी संपत्तीची नासधूस करण्याचा अधिकार नाही, असे पोलिसांनी सांगितले. रितसर परवानगी घेऊन एखादे आयोजन केले असेल तर त्याविरोधात बोलू इच्छिणाऱ्यांनी लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे. सर्कसच्या व्यवस्थापनाने केलेल्या व्यवस्थेची मोडतोड केल्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर झाला. रस्त्यावर आलेल्या उंटांमुळे अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुंपण तोडणारे घेणार होते का, असा सवाल पोलिसांनी उपस्थित केला. उंटांनी रस्त्यावर गोंधळ घातला नाही. यामुळे नवे गंभीर प्रश्न निर्माण झाले नाही. सुदैवाने परिस्थिती लवकर नियंत्रणात आली, असे पोलिसांनी सांगितले.

सध्या माद्रिदमधील सोशल मीडिया युझरमध्ये रस्त्यावर आलेल्या उंटांची चर्चा जोरात आहे. मिम्स, जोक्स अशा स्वरुपात अनेकांनी मतप्रदर्शन सुरू केले आहे. प्राणीमित्रांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी