Optical Illusion: या ऑप्टिकल इल्युजनमध्ये टोमॅटोमध्ये लपले आहेत सफरचंद...10 सेकंदात शोधून दाखवा

Viral Post : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रांचा पूर आला आहे. ऑप्टिकल इल्युजनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. युजर्सना या ऑप्टिकल इल्युजनमधून मनोरंजन आणि बौद्धिक कसोटी या दोघांचा मिलाफ अनुभवता येतो. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Optical illusion
ऑप्टिकल इल्युजन 
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन व्हायरल
  • युजर्सच्या बुद्धीची कसोटी पाहणारी ऑप्टिकल इल्युजन
  • सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची वाढती लोकप्रियता

Viral Optical Illusion:नवी दिल्ली : अलीकडच्या काळात सोशल मीडियावर (Social Media) एक गोष्ट खूपच लोकप्रिय झाली आहे आणि ती खूपच ट्रेंड होते आहे. ती म्हणजे वेगवेगळे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion). सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रांचा पूर आला आहे. ज्यामध्ये काहीतरी दडलेले असते आणि ते शोधण्याचे आव्हान नेटिझन्सना दिले जाते. ही गोष्ट सांगणे सोपे वाटते, पण जेव्हा तुम्हाला ब्रेन टीझर देऊन दडलेली गोष्ट शोधून काढण्यास सांगितले जाते, तेव्हा शोधणे खरोखरच अवघड जाते. म्हणूनच त्यांना ऑप्टिकल भ्रम असे म्हटले जाते. हे खरे तर भ्रामक चित्र आहे. कलाकार ते अशा प्रकारे डिझाइन करतात की यजर्स ते सहजपणे आव्हान पेलू शकत नाहीत. (Can you find out tomatoes in this Optical Illusion) 

अधिक वाचा :  उद्याचा रंग- हिरवा, द्या शुभेच्छा, Facebook-Whatsapp मेसेज

टोमॅटोमध्ये शोधा सफरचंद

आपण आता असाच आणखी एक मजेदार ऑप्टिकल इल्युजन टेस्ट तुमच्यासाठी  घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये अनेक टोमॅटोमध्ये तीन सफरचंद लपलेले आहेत. त्याच्या निर्मात्याने ते इतके हुशारीने बनवले आहे की तुम्हाला ते गरुडाच्या डोळ्याशिवाय सापडणार नाही. तीक्ष्ण दृष्टी असल्याचा दावा करणारा युजरदेखील या दृश्‍य भ्रमापुढे पाणी मागणार म्हणा. चला तर मग पाहू या की तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही लपवलेले सफरचंद 10 सेकंदात शोधू शकता का. तर तुमची वेळ आता सुरू झाली आहे. हे चित्र काळजीपूर्वक पहा आणि तीन सफरचंद कुठे आहेत ते सांगा.

ही एकप्रकारची कोडीच असतात. काही कोडी सोडवता सोडवता डोक्याचा भुगा होतो मात्र योग्य उत्तर हाती येत नाही. असेच एक वरकरणी दिसायला सोपे मात्र अतिशय अवघड असे ऑप्टिकल इल्युजन सध्या व्हायरल (Viral Optical Illusion) झाले आहे. हे ऑप्टिकल इल्युजन लोकांना खूप आवडले आहे.

अधिक वाचा : "शिरूरमधील काही माणसं 'ढळली' पण खरी 'अढळ' माणसं माझ्यासोबत" 

सफरचंद पाहिलं का?

तुमच्या माहितीसाठी असे काही ऑप्टिकल भ्रम आहेत जे बहुतेक लोक सोडवण्यात अयशस्वी ठरतात. अशा परिस्थितीत त्याला तडा जाण्यासाठी माणसांच्या मनाचे घोडे थोडे वेगाने पळावे लागते. सहसा लोक असे कोडे पाहून कंटाळतात आणि हार मानतात. पण आम्हाला खात्री आहे की तुम्हाला सफरचंद सापडले असतील.

आपण अद्याप सफरचंद पाहिले नसल्यास, ते शोधण्यात मदत करूया. जर तुम्ही चित्राच्या तळाशी आणि उजव्या बाजूला दोन ओळी वगळता पाहिले तर तुम्हाला लपवलेले सफरचंद दिसतील. 

अधिक वाचा : शेलारांकडे अशोक चव्हाणांची नेमकी कोणती क्लिप? जाहीर केली तर

अनेक ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ही एकप्रकारची कोडीच असतात. एक वरकरणी दिसायला सोपे मात्र अतिशय अवघड असे ऑप्टिकल इल्युजन सध्या व्हायरल झाले आहे. हे ऑप्टिकल इल्युजन लोकांना खूप आवडले आहे. या भन्नाट ऑप्टिकल इल्युजनमध्ये पुस्तकांमध्ये एक पेन्सिलही दडलेली आहे. तुम्हाला ती सापडतेय का ते पाहा. 

इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या जमान्यात लक्ष वेधून घेणारे किंवा मनोरंजक अशा गोष्टी लगेच व्हायरल होतात. स्मार्टफोनमुळे त्या तात्काळ जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोचत असतात. युजर्स विविध सोशल मीडियावरून त्या व्हायरल करतात. त्यावर प्रतिक्रियादेखील दिल्या जातात. त्यामुळे त्यांची लोकप्रियतादेखील वाढत जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी