Optical Illusion: सोशल मीडियावर (social media) अनेक फोटो व्हायरल (photo viral) होत असतात. काही फोटो फार छान असतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा परत पहावंस वाटतं. तर काही फोटो इतके विचित्र असतात की कितीही वेळा पाहिले तरी कळत नाहीत. हे फोटो गोंधळात टाकणारे असतात. हे फोटो ऑप्टिकल इल्युजन (optical illusion) असणारे असतात. खुप सारे लोक या फोटोतील नेमकं उत्तर देऊ शकत नाहीत. काही लोकांना या फोटोचे उत्तर देण्याचे आव्हान स्विकारण्यास आवडतं. अशाच प्रकारे ऑप्टिकल इल्युजनचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत खुप सारी कासवं असून त्यात एक साप लपला आहे. परंतु हा साप सहजासहजी दिसत नाहिये. (can you find snake in optical illusion viral photo news in marathi)
ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकरचे चॅलेंज दिले जाते. त्यात लोकांना पटक उत्तर देता येत नाही. हे फोटो इतके गोंधळात टाकणारे असतात की याचे उत्तर सहजासहजी देताच येत नाही. या फोटोमध्ये खुप सारी कासवं आहेत. त्यात साप शोधण्याचे चॅलेंज आहे. त्यातही अवघ्या १५ ते ३० सेकंदात साप शोधण्याचे चॅलेंज आहे. परंतु यात साप लवकरच सापडत नाही. तुम्ही पण हा फोटो बघा आणि लवकरात लवकर साप शोधून दाखवा.
या कासवांच्या मांदियाळीत साप शोधून दाखवणे इतके सोपे नाही. त्यासाठी हा फोटो व्यवस्थित पहावा लागेल. जर तुम्हाला या कासवांच्या गर्दीत साप दिसला तर तुम्ही फार हुशार आहात. जर तुम्हाला साप दिसत नसेल तर तुम्ही दुसरा फोटो बघा त्यात तुम्हाला दिसेल की तो कासव नसून साप आहे. कारण सापाची जीभ बाहेर आली आहे. हा फोटो तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा आणि कासवातला साप शोधून काढण्याचे चॅलेंज द्या.