Optical Illusion: या फोटोतली मांजर दाखवा शोधून, भल्या भल्यांना फुटला घाम पण चॅलेंज झाले नाही पूर्ण

सोशल मीडियावर सध्या काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून नेटकरी चांगलेच गोंधळात पडत आहेत. या फोटोंना ऑप्टिकल इल्युजन असे म्हटले जाते. सुरूवातीला या फोटोमधील एखादी वस्तू किंवा प्राणी शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. परंतु हा फोटो खूप निरखून पाहूनही ती वस्तू किंवा प्राणी दिसत नाही.

cat optical illusion
ऑप्टिकल इल्युजन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर सध्या काही फोटो व्हायरल होत आहे.
  • हे फोटो पाहून नेटकरी चांगलेच गोंधळात पडत आहेत.
  • या फोटोंना ऑप्टिकल इल्युजन असे म्हटले जाते.

Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर सध्या काही फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून नेटकरी चांगलेच गोंधळात पडत आहेत. या फोटोंना ऑप्टिकल इल्युजन असे म्हटले जाते. सुरूवातीला या फोटोमधील एखादी वस्तू किंवा प्राणी शोधण्याचे चॅलेंज दिले जाते. परंतु हा फोटो खूप निरखून पाहूनही ती वस्तू किंवा प्राणी दिसत नाही. हे फोटो इतके गोंधळात टाकणारे असतात की चॅलेंज सुटले असे म्हणताच ते खरं तर सुटलेले नसते. कारण या फोटोत ते प्राणी किंवा वस्तू फार शिताफीने लपलेल्या असतात. (Can You Spot Cat in hidden optical Illusion Viral Photo story in marathi)

ऑप्टिकल इल्युजन फोटोमधील वस्तू किंवा प्राणी सहजासहजी दिसत नाही. या फोटोत तो प्राणी किंवा वस्तू शोधता शोधता अक्षरशः घाम फुटतो. परंतु हे चॅलेंज पूर्ण होत नाही. आता एक नवीन फोटो व्हायरल होत आहे. त्यातही हे चॅलेंज पूर्ण होताना दिसत नाहिये. एका फोटोत नेटकरी मांजर शोधण्याचा प्रयत्न करत अहेत. अनेकांनी ही मांजर शोधून सापडत नाहिये आणि त्यांनी अक्षरशः हात टेकले आहेत. तुम्ही पण हा फोटो बारीक नजरेने पहा आणि मांजर शोधून दाखवा. बघुया तुमची नजर किती चांगली आहे.

 

फोटोने काढला घाम

सोशल मीडियावर 'There is no cat in this image' या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला आतापर्यंत ६ हजार ६७९ जणांनी लाईक केले आहे. तर २८९ जणांनी रिट्विट म्हणजेच शेअर केले आहे. या फोटोतील मांजर शोधताना अनेकांना घाम फुटला आहे, पण मांजर काय सापडली नाही.

खुप लोक या फोटोतली मांजर शोधून शोधून थकले आहेत. काही नेटकर्‍यांनी फोटोमध्ये काळे आणि पांढर्‍या रंगाचे काही पाहिले आहे. जर तुम्हालाही यात मांजर दिसली नसेल तर तुमच्यासाठी खाली आम्ही दुसरा फोटो पोस्ट केला आहे. त्यात तुम्हाला या फोटोत लगेच मांजर दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी