Chenab Bridge: 'स्वर्गाहून सुंदर'... तुम्हीही श्वास रोखून पाहाल हा पूल!

Chenab Bridge Viral Photos: चिनाब नदीवरील पूल जवळपास तयार झाला आहे. हा पूल तयार करण्यासाठी तब्बल 18 वर्षे लागली. हा प्रकल्प डिसेंबर 2022 पर्यंत जवळजवळ तयार होईल. या पुलाचे काही फोटो आता समोर आले आहेत. जे पाहून आपणही थक्क व्हाल.

captivating pictures of beautiful from heaven chenab bridge clouds above bridge below sight will stop breathing
Chenab Bridge: 'स्वर्गाहून सुंदर'... तुम्हीही श्वास रोखून पाहाल हा पूल!  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • चिनाब नदीवरील पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात
  • पूल बांधण्यासाठी 1100 कोटींहून अधिक खर्च
  • चिनाब नदीवरील पुलाचे दृश्य पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Chenab Bridge Viral photos: जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) चिनाब नदीवरील सर्वात उंच पुलाचे (Chenab Bridge) काम पूर्ण झाले आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा पूल जवळजवळ एखाद्या आश्चर्याप्रमाणेच आहे. कारण त्याची रचनाच इतक्या सुंदर पद्धतीने करण्यात आलं आहे. ज्यांनी-ज्यांनी हे फोटो पाहिले आहे त्या प्रत्येकाने आनंद व्यक्त केला आहे. हे फोटो पुन्हा-पुन्हा पाहावे एवढे मनमोहक आहेत. हे फोटो  पाहिल्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल की, चिनाब म्हणजे जणू काही स्वर्गच आहे. चला तर मग जाणून घेऊया चिनाब पुलाबाबतच्या काही रंजक गोष्टी... (captivating pictures of beautiful from heaven chenab bridge clouds above bridge below sight will stop breathing)

चिनाब नदीवर पूल बांधणे हे आव्हानात्मक काम होते. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास 18 वर्षे लागली. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे दृश्य दिसायला खूप सुंदर आहे. कारण, खाली ढग आणि वर पूल असं हे मनमोहक दृश्य लोकांना खूप रोमांचित करत आहेत.

अधिक वाचा: Revers Gear Car Record : 16 किमी रिव्हर्स गेअरमध्ये चालवली गाडी, तमिळनाडूच्या पठ्ठ्याने केरळच्या तरुणाचा मोडला रेकॉर्ड

111 किमी लांबीचा नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी, पहिल्यांदा रेल्वेने 205 किमी लांबीचा रस्ता तयार केला. या भागात जाण्यासाठी 26 किलोमीटरची लाईन टाकण्यात आली आहे. तसेच अनेक पूल आणि बोगदे बांधावे लागले आहेत. त्यानंतरच चिनाब पुलाचे काम सुरू झाले होते.

अधिक वाचा: Tiger in Party: पार्टी सुरू असताना खऱ्या वाघाची एन्ट्री, जीव वाचवण्यासाठी सर्वांची धावाधाव, पाहा VIDEO

आश्चर्यकारक दृश्य

या पुलामुळे कौडी आणि वक्कल हे प्रदेश एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्याची उंची नदीच्या पातळीपेक्षा 359 मीटर आहे. जर या पुलाच्या उंचीची तुलना कुतुबमिनारशी केली तर ती त्यापेक्षा पाचपट जास्त आहे. तसंच, फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा हा पूल 35 मीटर अधिक उंच आहे. 

डिसेंबर २०२२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे सध्या तरी सांगण्यात येत आहे. हा पूल बांधण्यासाठी तब्बल 1100 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. सुरुवातीला याची किंमत अंदाजे 500 कोटी रुपये एवढी होती. हा पूल इतका मजबूत बनवण्यात आला आहे की, 260 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्याचाही त्याला फटका बसणार नाही. तर तुम्ही देखील या सुंदर फोटोंचा आनंद घ्या आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून जरुर सांगा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी