Casino Fight Video: अरे देवा, या लोकांना झालंय काय! खेळ खेळता खेळता कॅसिनोमध्ये जबदस्त फाईट, एकमेंकांवर भिरकावल्या खुर्च्या

Casino Fight Video: सोशल मीडियावर अमेरिकेच्या (America) अटलांटिक सिटी (Atlantic City Fight) चा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ (video) मध्ये अनेक लोक कॅसिनो (casino) मध्ये बसलेले दिसत आहेत,

Casino Fight Video
कॅसिनोमध्ये खेळ खेळताना लोकांची एकमेंकांना जबरदस्त मारहाण  |  फोटो सौजन्य: Twitter

Casino Fight Video: अटलांटिक  :  सोशल मीडियावर अमेरिकेच्या (America) अटलांटिक सिटी (Atlantic City Fight) चा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ (video) मध्ये अनेक लोक कॅसिनो (casino) मध्ये बसलेले दिसत आहेत, परंतु अचानक काहीतरी घडते आणि संपूर्ण वातावरण बदलते. लोक एकमेकांशी भांडू लागतात. एवढेच नाही तर ते एकमेकांवर खुर्च्यांनी हल्ला करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ (व्हायरल फाईट व्हिडीओ) समोर आल्यानंतर अचानक तिथे काय घडले याचे लोकांना आश्चर्य वाटते. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे.

अमेरिकेतील या घटनेचा व्हिडिओ @BeatinTheBookie नावाने ट्विटर हँडल शेअर केले. कॅसिनोमध्ये सूट-बूट घातलेले अनेक लोक दिसत आहेत, मात्र काहीतरी अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असून लोक एकमेकांवर बुक्क्यांनी, खुर्च्यांनी हल्ले करत सभ्य लोकांचं असभ्य वर्तन दिसत आहे.   या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयातही दाखल करावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक सुरक्षा रक्षकही हस्तक्षेप करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ४६७.७ हून अधिक लोकांनी पाहिला असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर टिप्पणी केली, 'माझ्यासाठी हा अटलांटिक सिटीमधील एक नियमित दिवस असल्यासारखा वाटतो.' दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'त्या सुरक्षा रक्षकांना टाळ्या झाल्या पाहिजेत.'


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी