Viral Video : भरपूर मासे पाहून मांजराच्या तोंडाला सुटलं पाणी, मग असा झाला पोपट

समोर मासे दिसत असताना कुठलं मांजर शांत बसेल? माशांवर झेपावणाऱ्या एका मांजराचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Viral Video
भरपूर मासे पाहून मांजराच्या तोंडाला सुटलं पाणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मांजराला दिसले भरपूर मासे
  • तोंडाला सुटलं पाणी
  • मासे पकडण्यासाठी झेपावताच झाला पोपट

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) मांजरांचे अनेक व्हिडिओ (Video of cat) आपल्याला पाहायला मिळतात. रोजच्या रोज मांजरांशी संबंधित शेकडो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होत असतात. भारतात अनेक घरांमध्ये मांजर पाळली जाते. अर्थात, अनेकांना मांजर पाळायला अजिबात आवडत नाही. मात्र परदेशात बहुतांश घरांमध्ये मांजर पाळली जाते. या मांजराचे सगळे लाड पुरवले जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील मांजराचा व्हिडिओ हा परदेशातील असल्याचं दिसतं. या व्हिडिओत मांजराची झालेला गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेला एक विनोद दिसतो.

मांजराचा मजेदार किस्सा

मांजर हा असा पाळीव प्राणी आहे, जो घरातील प्रत्येक कानाकोपरा तपासून पाहतो. घराच्या प्रत्येक खोलीत त्याला सहज प्रवेश मिळतो आणि कुठल्याही कोपऱ्यात मांजर पहुडलेले दिसते. पूर्ण घरात वावर असणारे मांजर जेव्हा अशी एखादी गोष्ट पाहतं, जी त्याने अगोदर कधीच पाहिलेली नसते, तेव्हा मात्र त्याची प्रतिक्रिया मजेशीर असते. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मांजराने पाहिले मासे

या व्हिडिओत मांजर एका सोफ्यावर उभे राहून समोर लावलेला टीव्ही पाहत असल्याचे दिसते. समोरच्या टीव्हीवर एक जलप्रवाह दिसतो आणि त्यात मासे दिसतात. मासे एकामागून एक एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात असल्याचे या व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ पाहून मांजराच्या तोंडाला पाणी सुटते. सोफ्याच्या अगदी वरच्या कोपऱ्यावर येऊन हे मांजर मासे पकडण्याची तयारी करतं. समोर दिसणाऱ्या माशांपैकी एखादा मासा पकडवून मटकावून टाकावा, असं मांजराला वाटतं. काही वेळ दबा धरून बसल्यानंतर जवळून चाललेला एक मासा मांजराला दिसतो. तत्क्षणी मांजर टीव्हीवर झेपावतं आणि मासे पकडण्याचा प्रयत्न करतं.

अधिक वाचा - Optical illusion : हे हलणारे ट्रिप्पी ऑप्टिकल इल्युजन थांबवून दाखवा बरं...फार थोड्यांनाच होते शक्य

मांजराचा झाला पोपट

अर्थातच, समोर टीव्ही असल्यामुळे टीव्हीच्या काचेला धडकून मांजर जमिनीवर पडतं आणि त्याचं तोंड आपटतं. केवळ नैसर्गिक गोष्टींचं भान असणाऱ्या प्राण्यांना टीव्हीचं आभासी जग आपल्यासमोर आहे, हे समजतच नाही. त्यामुळेच कदाचित समोर दिसणाऱ्या सर्व गोष्टी या सत्यच आहेत, असं मानण्याचा प्राण्यांचा प्रघात असतो. त्यानुसारच या मांजराने टीव्हीवर झेप घेतल्याचं स्पष्ट होतं. 

अधिक वाचा - Snake in Lunch : विमानात जेवताना सावधान! जेवणात सापडलं सापाचं तुटलेलं डोकं, पाहा VIDEO

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेकांची हसून हसून अक्षरशः पुरेवाट झाली आहे. केवळ 13 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 35 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी