Boyfriend Girlfriend Video: प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात तेव्हा या जगात त्यांच्यासारखं आनंदी कोणीच नसतं. अनेकवेळा लोक प्रेमात इतके वेडे होतात की त्यांना काहीच समजत नाही. ते फक्त त्यांचे प्रेम पाहतात. त्याशिवाय त्यांना काहीही आवडत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचे मनही हेलावून जाईल.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा रस्त्याच्या मधोमध गुडघे टेकून आपल्या चिडलेल्या गर्लफ्रेंची समजूत काढत आहे. तुम्ही बघू शकता की, मुलगा तिच्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी थेट तिचे पाय देखील धरतो. यानंतर व्हिडीओमध्ये जे काही दिसत आहे त्यामुळे लोक दु:खी झाले आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, मुलीने असं वागायला नको होतं. त्याचबरोबर अनेक लोक असेही म्हणत आहेत की, जेव्हा मुलगी प्रेमात होती तेव्हा मुलाने तिचा आदर केला नाही. त्यामुळे ती आता त्याला सोडून जात आहे. व्हिडीओ पहा-
अधिक वाचा: Viral Video: बिकिनीमध्ये फिरणाऱ्या मुलींमध्ये पोहोचली साडीमधील महिला..
प्रेयसी सोडून निघून गेली
रस्त्याच्या कडेला एक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड उभे असलेले तुम्हाला दिसत आहेत. दोघांकडे बघून असे दिसते की मुलीचे आता त्या मुलाशी नाते तुटले आहे. पण मुलाला त्या मुलीसोबत राहायचे आहे. मुलीचे मन वळवण्यासाठी तो रस्त्याच्या मधोमध गुडघ्यावर बसतो. तिची प्रचंड विनवणी करतो. मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत तो मुलीचे पाय धरून खालीच बसतो, जेणेकरून प्रेयसी आतातरी आपलं म्हणणं ऐकेल असं त्याला वाटतं.
दुसरीकडे, मुलीने या नात्यातून पुढे जाण्याचा विचार केला आहे. तुम्ही बघू शकता की मुलाच्या बोलण्याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही आणि ती त्याला निघून जाण्यास सांगते. दुसरीकडे प्रियकर आपल्या चिडलेल्या प्रेयसीचं मन वळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो.
यानंतर दुसरा मुलगा फ्रेममध्ये दिसतो. व्हिडिओत दिसत आहे की मुलगी सहमत नाही आणि दुसऱ्या मुलासोबत निघून जाते. हा व्हिडिओ papisociety नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.