CBSE Term 1 Result 2021 Date Notice Fake News Alert: नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, सीबीएसई १२वीचा आज निकाल जाहीर होणार अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे अनेक विद्यार्थी आणि पालक संभ्रमित झाले आहेत. ही पोस्ट फेक असल्याचे समोर आले आहे. या पोस्टनुसार सीबीएसईने आपल्या cbse.gov.in या वेबसाईटवर २५ जानेवारी रोजी सीबीएसईचा १२ वीचा निकाल जाहीर होईल असे म्हटले आहे. परंतु अशा कुठल्याच प्रकारे निकाल जाहीर होणार नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. म्हणून ही पोस्ट फेक असल्याचे निष्पण्ण झाले आहे.
अधिक वाचा : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून होतेय अतिरिक्त शुल्काची वसुली?; शिक्षण विभागाने घेतली गंभीर दखल
सीबीएसई बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यावर स्पष्टीकरण केले आहे. ही नोटीस फेक असून आज कुठलाही निकाल जाहीर होणार नसल्याचे सीबीएसई म्हटले आहे. सीबीएसई ने आपली वेबसाईट cbse.gov.in वर कुठलेही अधिकृत पत्रक जाहीर केलेले नाही.
#cbseforstudents #Exams #Fake #CBSE pic.twitter.com/HpeUKjfShd
— CBSE HQ (@cbseindia29) January 25, 2022
अधिक वाचा :किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
सीबीएसई २०२१ च्या निकालाची ही व्हायरल पोस्ट नेमकी कुठून व्हायरल झाली हे अद्याप कळालेले नाही. परंतु त्यात वापरण्यात आला लोगो आणि डिझाईनमुळे ही पोस्ट खरी असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांना वाटले. त्यांनी ही पोस्ट पाहून लगेच निकालाबाबत माहिती घेण्यास सुरूवात केली. फक्त बारावीच नाही तर दहावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही संभ्रमित झाले. कारण दहावीच्या परीक्षेचाही निकाल बाकी आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल फेब्रुवारी अखेर लागेल अशी माहिती अधिकार्यांनी दिली होती. तसेच फक्त अधिकृत वेबसाईट आणि सोशल साईट्सच्या पोस्टवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन सीबीएसई बोर्डाने केली आहे.
अधिक वाचा : ५०० रुपयांत मिळणात एलपीजी गॅस सिलिंडर, मुख्यमंत्र्यांनी दिले वचन