CBSE Results: सीबीएसईच्या निकालानंतर एका आईची पोस्ट होतेय व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 08, 2019 | 16:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

CBSC Results: सीबीएससीचा निकाल लागल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावरही कौतुक सोहळा रंगत आहे. पण, त्या गर्दीतही एका आईची पोस्ट मात्र लक्ष वेधून घेत आहे. तिच्या मुलाला ६० टक्के मार्क्स मिळाले आहेत.

Mothers post after CBSE results
सीबीएसई निकालानंतर एका आईची पोस्ट व्हायरल  |  फोटो सौजन्य: Getty Images

नवी दिल्ली : सीबीएसईचे परीक्षांचे निकाल जाहीर होत आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण, या ९० टक्के वाल्यांच्या गर्दीत काही पडलेले चेहरेही दिसत आहेत. अपेक्षित मार्क न मिळाल्यानं चुकीची पावलं उचलली जाऊ शकतात. दुसरीकडे सोशल मीडियावर यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो आणि कौतुक सोहळ्याचा पोस्ट धडाधड पडत आहेत. त्यातच एका आईची पोस्ट मात्र लक्ष वेधून घेत आहे. तिच्या मुलाला काही ९० टक्के मार्क्स मिळालेले नाहीत. पण, ती खूप खूष आहे. मुलाला ६० टक्के मार्क्स मिळाले आहेत. पण, त्याचं मनोबल कमी होऊ नये म्हणून, त्याच्या आईने त्याचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये तिनं आपल्या मुलाच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.

मुलाच्या यशाची केली प्रशंसा

शाळा, कॉलेजचे निकाल येताना अयशस्वी ठरलेल्या अनेकांनी आपलं आयुष्य संपवल्याचा अनेक दुर्देवी बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. तर, दुसरीकडं यशस्वी विद्यार्थ्यांच्या फोटोंनी वर्तमानपत्रांचे रकाने भरून निघत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत याविषयी खूप लिहिलं जातंय, सांगितलं जातंय. या सगळ्या वातावरणामुळे कमी टक्के पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःविषयी नकारात्मक भावना तयार होऊ लागल्या आहेत. या सगळ्यामध्ये फेसबुकवर वंदना सुफिया कटौच यांची पोस्ट खूपच लाईक्स मिळवू लागली आहे. या पोस्टच्या माध्यमातून वंदना यांनी पालकांना एक मेसेज दिला आहे. त्याचे विशेष कौतुक होत आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल ६ मे रोजी जाहीर झाला वंदना यांचा मुलगा आमेर याला ६० टक्के मार्क्स मिळाले. पण, वंदना यांनी त्याच्या याची तुलना इतर मुलांच्या गुणांशी केली नाही. नैराश्येतून त्यानं काही चुकीच पाऊल उचलू नये, यासाठी वंदना यांनी मुलाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. वंदना यांनी फेसबुकवर पोस्ट करताना, आमेरचा आपल्याला गर्व असल्याचे म्हटले आहे.

 

 

काय केली पोस्ट?

आमेरच्या ६० टक्के गुणांविषयी फेसबुकवर पोस्ट करताना वंदना यांनी म्हटले आहे की, 'बाळ आमेर. आपल्याकडं माशानं झाडावर चढण्याची अपेक्षा केली जाते. पण, त्याउलट तू तुझ्या कक्षेत आणि क्षमतेनुसार एक मोठं यश संपादन कर. मासा कधीच झाडावर चढू शकत नाही. पण, तो मोठ्या समुद्राला आपलं क्षेत्र बनवू शकतो. तसेच तू तुझे लक्ष्य तयार कर. माझ्या बाळा तुझ्या आईकडून तुला खूप खूप शुभेच्छा. तू तुझ्यातील चांगुलपणा आणि उत्सुकता हे गुण कायम ठेव.' वंदना यांची ही पोस्ट काही मिनिटांतच खूप व्हायरल झाली. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर चांगल्य कमेंट्स केल्या असून, वंदना यांचा ग्रेट मदर असा उल्लेख केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
CBSE Results: सीबीएसईच्या निकालानंतर एका आईची पोस्ट होतेय व्हायरल Description: CBSC Results: सीबीएससीचा निकाल लागल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावरही कौतुक सोहळा रंगत आहे. पण, त्या गर्दीतही एका आईची पोस्ट मात्र लक्ष वेधून घेत आहे. तिच्या मुलाला ६० टक्के मार्क्स मिळाले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola