IKEA मध्ये गोंधळ, आरडाओरडा आणि पळापळ, नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

Chaotic situation in Shanghai IKEA Mall : चीनची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांघायमध्ये एक विचित्र परिस्थिती दिसली. आयकिया या स्वीडीश नागरिकाने स्थापन केलेल्या फर्निचर आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या रिटेल शॉपिंग मॉलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

Chaotic situation in Shanghai IKEA Mall
IKEA मध्ये गोंधळ, आरडाओरडा आणि पळापळ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IKEA मध्ये गोंधळ, आरडाओरडा आणि पळापळ
  • नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर
  • चीनमध्ये मोबाइलमध्ये येणारा रेड सिग्नल हा प्रकार लोकांना कायम दहशतीत ठेवत आहे

Chaotic situation in Shanghai IKEA Mall : चीनची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांघायमध्ये एक विचित्र परिस्थिती दिसली. आयकिया या स्वीडीश नागरिकाने स्थापन केलेल्या फर्निचर आणि इतर गृहोपयोगी वस्तूंच्या रिटेल शॉपिंग मॉलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. । व्हायरल झालं जी

शांघायच्या आयकिया मॉलमध्ये फिरत असलेल्या एका ग्राहकाच्या मोबाइलमधील कोविड अॅपमध्ये रेड सिग्नल आला. या सिग्नलचा अर्थ संबंधित व्यक्ती कोरोनाबाधिताच्या संपर्कात असल्यामुळे किंवा संपर्कात आल्यामुळे कोरोनाबाधीत असू शकते असा होतो. हा सिग्नल आला त्याचवेळी मॉल परिसरात स्थानिक पोलिसांची टीम आली. 

चीनमध्ये जेव्हा मोबाइलवर रेड सिग्नल येतो त्यावेळी संबंधित मोबाइलचे लोकेशन जवळच्या पोलीस ठाण्याला कळवले जाते. याच कारणामुळे पोलीस मॉलमध्ये आले. ग्राहकाच्या संपर्कात आलेल्या इतर अनेकांना कोरोनाचा धोका असू शकतो असे कारण देत पोलीस मॉल सील करत होते. मॉलच्या आतमध्ये असलेल्या सरसकट सर्वांना तिथून क्वारंटाइन सेंटर येथे नेण्याचा निर्णय झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. पोलिसांनी निर्णय सांगताच नागरिक घाबरले. सरकारी क्वारंटाइन सेंटरवर जाण्यापेक्षा घर गाठलेले बरे असा विचार करून ग्राहकांनी मॉलच्या बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड केली. अखेर ग्राहकांच्या मोठ्या रेट्यामुळे पोलिसांना मॉलचे मुख्य प्रवेशद्वार उघडावे लागले. यानंतर मॉल मधील अनेक ग्राहक वाट दिसेल त्या दिशेने पळत होते. जो तो लवकर मॉल बाहेर सुरक्षित ठिकाणी जाऊ इच्छीत होता.

शांघायच्या आयकिया मॉलमधील गोंधळाच्या स्थितीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी लागू आहे. याचा अर्थ एखाद्या शहरात एक कोरोना रुग्ण आढळला तरी संपूर्ण शहरात लॉकडाऊन केले जाते. व्यापार बंद केला जातो. कोरोना रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्या अनेकांना क्वारंटाइन केले जाते. चीन सरकारच्या या धोरणामुळे कोरोना संकट सुरू झाल्यापासून चिनी अर्थव्यवस्था मंदावली आहे. अर्थचक्राची गती मंदावली तरी चीनने झिरो कोविड पॉलिसी आजही सुरू ठेवली आहे. यामुळे चीनमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मोबाइलमध्ये येणारा रेड सिग्नल हा प्रकार लोकांना कायम दहशतीत ठेवत आहे. या रेड सिग्नलच्या भीतीपोटी अनेक नागरिकांच्या दैनंदिन वर्तनावर परिणाम झाला आहे. पण चीन सरकार या सर्व बाबींचा विचार करण्यापेक्षा झिरो कोविड पॉलिसी कठोरपणे राबविण्यावरच ठाम दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी