आश्चर्यकारक, 'या' देशात जन्मला तीन लिंगांसह मुलगा, डॉक्टरदेखील थक्क

व्हायरल झालं जी
Updated Apr 03, 2021 | 20:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

इराकमध्ये एक मुलाचा ३ लिंगासह जन्म झाला आहे. वैद्यकीय इतिहासातील ही पहिलीच अशी घटना आहे. प्राथमिक लिंगाच्या मूळाशेजारून एक लिंग वाढत होते तर आणखी एक लिंग अंडकोशाच्या खाली होते. डॉक्टरदेखील थक्क.

Male Child born with 3 penis, Doctors surprised
इराकमधील घटना वैद्यकीय इतिहास पहिलीच केस 

थोडं पण कामाचं

  • मुलाचा ३ लिंगासह जन्म
  • इराकमधील डुहोक क्षेत्रातील ही घटना
  • 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस'मध्ये या दुर्मिळ घटनेबद्दल छापून आले

नवी दिल्ली: इराकमध्ये एका मुलाचा ३ लिंगासह जन्म झाला आहे. डॉक्टरसुद्धा या घटनेने थक्क झाले आहेत. वैद्यकीय इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात येते आहे.
इराकमधील डुहोक क्षेत्रातील ही घटना आहे. तीन महिन्यांच्या या बाळाला त्याचे आई-वडील जेव्हा इस्पितळात घेऊन आले तेव्हा त्या बाळाच्या अंडकोशांना सूज आलेली होती. डॉक्टरांनी त्या बाळाची तपासणी केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की या मुलाचे आणखी दोन लिंग विकसित होत आहेत. त्याच्या प्राथमिक लिंगाच्या मूळाशेजारून एक लिंग वाढत होते तर आणखी एक लिंग अंडकोशाच्या खाली होते.

अनुवांशिक व्यंग नाही


त्या मुलाच्या लिंगाच्या रचनेने डॉक्टरदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. डॉक्टरांनी या घटनेचे अतिशय दुर्मिळ प्रकारात वर्गीकरण केले आहे. शिवाय हा मुलगा गर्भात असताना याचा कोणत्याही हानिकारक औषधाशीदेखील संपर्क आलेला नाही. त्याचबरोबर त्या मुलाच्या कुटुंबात अनुवांशिक व्यंगाचादेखील इतिहास नाही. कोणतेही असे कारण समोर दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनाही याची कारणमीमांसा करता आलेली नाही. 

आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये आली माहिती


'इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस'मध्ये या दुर्मिळ घटनेबद्दल छापून आले आहे. हा संशोधन निबंध किंवा पेपर शाकिर सलीम जाबली आणि आयद अहमद मोहम्मद यांनी लिहिला आहे. या अहवालात म्हटले आहे की तीन लिंगांची स्थिती ही एक अपरिवर्तनीय स्थिती असते. म्हणजे मुलाच्या लिंगाच्या स्थितीत नैसर्गिकरित्या कोणताही बदल होणार नाही. ५० ते ६० लाख लोकांमध्ये एखाद्याच व्यक्तीला या प्रकारच्या व्यंगाला सामोरे जावे लागते. त्यातच तीन लिंग असल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.

कागदोपत्री पहिलेच उदाहरण


मुलाची तपासणी करता असे आढळून आले की त्याच्या अतिरिक्त दोन लिंगांमध्ये मूत्रमार्ग किंवा मूत्रनलिका नाही. त्यामुळे या दोन अतिरिक्त लिंगांना ऑपरेशनद्वारे काढण्यात येणार आहे. नोंद झालेल्या कागदपत्रांनुसार ज्ञात वैद्यकीय इतिहासातील हे पहिलेच उदाहरण आहे. डेली मेलनुसार, २०१५ मध्ये भारतातदेखील अशाच प्रकारे एका मुलाला तीन लिंग आढळून आले होते. मात्र कोणत्याही मेडिकल जर्नलमध्ये त्याची नोंद झालेली नसल्यामुळे इराकमधील या केसलाच पहिले अधिकृत उदाहरण समजले जाते आहे. मात्र कोणतीही अनियमितता किंवा कोणताही दोष बाळाच्या जन्माच्या वेळेस नसल्याने तसेच कोणतेही अनुवांशिक व्यंगासारखे कारण समोर न आल्याने डॉक्टरांना या केसमधील वैद्यकीय कारण लक्षात आलेले नाही. शिवाय याआधी कोणतीही अशी नोंद झालेली नसल्याने या प्रकारच्या केसच्या हाताळणीचा कोणताही संदर्भ उपलब्ध नाही.
 

हायलाईट्स :

१. इराकमध्ये तीन लिंगासह बाळाचा जन्म

२. इरकामधील डुहोक क्षेत्रातील घटना

३. 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस' घेतली नोंद

४. शाकिर सलीम जाबली आणि आयद अहमद मोहम्मद यांचा रिसर्च पेपर

५. ५० ते ६० लाख लोकांमध्ये एखाद्याच व्यक्तीमध्ये या प्रकारचे व्यंग

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी