दर 30 वर्षातून एकदा खडकातून बाहेर येतात अंडी, वाचा आगळीवेगळी रहस्यमय कथा

एक आगळीवेगळी चीनमधली बातमी समोर आली आहे. चिनी लोक दगडाची अंडी मिळवण्याकरिता काहीही करण्यासाठी तयार आहेत.

China mysterious rock
चीनमधील रहस्यमय खडक  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • आजपर्यंत आपण चीनमधली (China) अनेक रहस्यमय घटना ऐकल्या असतील.
  • चीनच्या गिझोउ प्रांतात दर 30 वर्षांनी अंडी देणारा एक खडक सापडला.
  • चिनी लोक दगडाची अंडी मिळवण्याकरिता काहीही करण्यासाठी तयार आहेत.

गिझोऊ: आजपर्यंत आपण चीनमधली (China) अनेक रहस्यमय घटना ऐकल्या असतील. वुहानच्या प्रयोगशाळेत कोरोना व्हायरसची (Corona Virus) निर्मिती असो किंवा स्वतःची कृत्रिम सूर्य बनवण्याची क्षमता असो, या बातम्या आजपर्यंत तुम्ही चीनमधल्या ऐकून आहातच. आता अशीच एक आगळीवेगळी चीनमधली बातमी समोर आली आहे. चीनच्या गिझोउ प्रांतात दर 30 वर्षांनी अंडी देणारा एक खडक सापडला  (Rocks Lays Eggs Every 30 Years)  आहे. या रहस्यमय अंडं मिळण्यामागचं कारण शोधण्याकरिता शास्त्रज्ञ बोलले आहेत, मात्र त्यांचे उत्तर समजून घेण्याऐवजी चिनी लोक दगडाची अंडी मिळवण्याकरिता काहीही करण्यासाठी तयार आहेत.

रहस्यमय खडकाबद्दल गावकऱ्यांचं मत काय? 

तुम्ही आजपर्यंत कोंबडीनं अंडी घालताना पाहिलं आहे. मात्र 'द मेट्रो'मध्ये एक वृत्त प्रसिद्ध झालं आहे. या वृत्तात चीनचा एक खडक अंडी घालतो. हा खडक 30 वर्षे अंडी आत ठेवतो. त्यानंतर 30 वर्षांनंतर हा खडक ती अंडी स्वतःपासून वेगळे करतो. या खडकाची उंची 19 फूट असून लांबी 65 फूट आहे. या अद्भूत आणि अकल्पनीय घटना बघण्यासाठी संपूर्ण चीनमधून लोक इथं येत असतात आणि त्यांना अंडी मिळावी यासाठी प्रार्थना करत असतात. 

गुलू गावाजवळ ही गुहा बांधण्यात आली आहे. या गुहेबद्दल परिसरातील गावकऱ्याचं म्हणणं आहे की, आम्ही याबद्दल आमच्या वडिलधाऱ्यांकडून ऐकलं होतं. सध्या अशी जवळपास 70 अंडी शिल्लक आहेत जी आतापर्यंत जतन करण्यात आली आहेत, तर बाकीची अंडी चोरीला गेली किंवा इतरत्र विकण्यात आली आहेत. 

हा रहस्यमय खडक चन दन या नावानं ओळखण्यात येतो. हा अंडी देणारा खडक काळ्या रंगाचा आहे. ज्याची अंडी बाहेरच्या बाजूनं गुळगुळीत असतात. ती अंडी हळूहळू स्वतःहून खडकाच्या पृष्ठभागावरून बाहेर पडत असतात आणि 30 वर्षांनंतर ते त्यापासून वेगळे होतात. ही प्रक्रिया जणू काही नैसर्गिक बाळंतपणाची प्रक्रिया पूर्ण केल्यासारखी असते. 

गुड लकशी संबंधित अंडी 

चिनी लोकांचा असा विश्वास आहे की, ही अंडी मोठ्या नशिबाचं प्रतिक आहेत. म्हणून ही अंडी घेण्यासाठी लोक येथे दरवर्षी येत असतात. मात्र लोकं ते पाहून माघारी परततात कारण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या नशिबात तो क्षण पाहणं नसतं. 

यावर शास्त्रज्ञ मत काय?

या अंड्यांबाबतचं गूढ उकलण्यात शास्त्रज्ञही गेल्या अनेक वर्षांपासून गुंतले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हा खडक लाखो वर्षे जुना आहे. खडकाला बरीच वर्ष उलटून गेली तरीही एक गोष्ट बदलली नाही, जी बऱ्याच काळापासून सर्व हवामानाचा सामना करत आहे, ते म्हणजे या खडकाची अंडी घालण्याची प्रक्रिया आणि प्रवृत्ती. 

चीनच्या नैऋत्य गिझोउ प्रांतातील कियानन बुएई आणि मियाओ भागातील गावांतील मूळ रहिवाशांनी या खडकामधून अंडी बाहेर पडण्यापासून ते खाली पडण्यापर्यंतची प्रक्रिया स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी