बापरे, तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन तुटल्या 4 बरगड्या

Chinese Woman Fractures 4 Ribs While Coughing After Eating Spicy Food : चीनची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांघायमध्ये घडलेल्या एका घटनेची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. शांघायमध्ये तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन एका महिलेच्या 4 बरगड्या तुटल्या.

Chinese Woman Fractures 4 Ribs While Coughing After Eating Spicy Food
बापरे, तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन तुटल्या 4 बरगड्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बापरे, तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन तुटल्या 4 बरगड्या
  • बरगड्या तुटल्यामुळे श्वास घेण्यास पण त्रास होऊ लागला
  • डॉक्टरांनी विशिष्ट प्रकारचे बँडेज लावून आराम करण्यास सांगितले

Chinese Woman Fractures 4 Ribs While Coughing After Eating Spicy Food : चीनची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांघायमध्ये घडलेल्या एका घटनेची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. शांघायमध्ये तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन एका महिलेच्या 4 बरगड्या तुटल्या. सुरुवातीला या महिलेला बरगड्या तुटल्याची जाणीव झाली नाही. पण हळू हळू छातीत वेदना होऊ लागल्या. अखेर संबंधित महिला डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तपासणी केली त्यावेळी बरगड्या तुटल्याचे लक्षात आले.

शिंक आली म्हणून बरगड्या तुटणे ही दुर्मिळ घटना आहे. पण संबंधित महिला 5 फूट 6 इंच उंचीची आहे. या महिलेचे वजन अतिशय कमी आहे. यामुळे शिंक आल्यावर बरगड्यांना मोठा हिसका बसला. हा हिसका सहन करण्यासाठी बरगड्यांजवळ सक्षम स्नायू नव्हते. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असे डॉक्टरांनी सांगितले. 

विधानसभा निवडणूक निकाल

होम लोन आणि कार लोन महागणार

हुआंग असे अडनाव असलेल्या चिनी महिलेला तिखट खाल्ल्यामुळे शिंक आली. जेव्हा शिंक आली त्यावेळी तिला छातीत थोडे दुखल्यासारखे वाटले. सुरुवातीला काय झाले हे तिला समजले नाही. पण वेदना वाढल्यावर तिने डॉक्टरांच्या सल्ल्याने सीटी स्कॅन केले. त्यावेळी तिला बरगड्या तुटल्याचे लक्षात आले. 

बरगड्या तुटल्यामुळे तिला श्वास घेण्यास पण त्रास होऊ लागला होता. डॉक्टरांनी विशिष्ट प्रकारचे बँडेज लावून हुआंगला महिनाभर आराम करण्यास सांगितले. यामुळे बरगड्या जोडण्यास मदत होईल, असे डॉक्टर म्हणाले. 

हुआंगची उंची 171 सेमी आणि वजन 57 किलो आहे. तिच्या शरीराच्या वरच्या भागाचे वजन एवढे कमी होते की शरीरावरील त्वचा अतिशय पातळ होती. तिच्या बरगड्या दिसत होत्या एवढी ती अशक्त झाली होती. बरगड्यांना धरून ठेवण्यासाठी आणि आधार देण्यासाठी स्नायू सक्षम नव्हते. यामुळेच तिखट खाल्ल्यानंतर आलेली शिंक हे निमित्त होऊन तिच्या बरगड्या तुटल्या असे डॉक्टर म्हणाले. 

आता हुआंगला डॉक्टरांनी आहार, विश्रांती आणि व्यायाम याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे तंतोतंत पालन केले तर लवकर बरी होशील, असे डॉक्टरांनी हुआंगला सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी