viral photos: हार्ले डेविडसन बाईकवरील मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांचे फोटो व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Jun 29, 2020 | 20:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

viral photos of cji bobade: भारताचे मुख्य न्यायाधीश अरविंद बोबडे रविवारी हार्ले डेविडसन बाईकवर बसलेले दिसले. बाईकवर बसलेला त्यांचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ss bobade
मुख्य न्यायाधीश एस ए बोबडे यांचे फोटो व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • सर्वोच्च न्यायालयाती मुख्य पदावर नियुक्त असलेले मुख्य न्यायाधीश एसए बोबडे यांना नेहमी काळ्या कोटमध्ये साऱ्यांनी पाहिे असेल.
  • त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता  की त्यांना बाईक आणि कार खूप आवडतात.
  • शरद अरविंद बोबडे(cji) सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मुंबई: असं म्हणतात की शौक बडी चीज है आणि ते पूर्ण करण्यासाठी लोक किती प्रयत्न करतात. आपला छंद पूर्ण करण्यासाठी कधीही वय आडवे येत नाही की पद. भारताचे मुख्य न्यायाधीश शरद अरविंद बोबडे(cji) सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांचे फोटो जगभरात पाहिले जात आहे. त्यांना नागपूरमध्ये हार्ले डेविडसन(harley davidson) बाईकवर फिरताना अनेकांनी पाहिले.

सर्वोच्च न्यायालयाती मुख्य पदावर नियुक्त असलेले मुख्य न्यायाधीश एसए बोबडे यांना नेहमी काळ्या कोटमध्ये साऱ्यांनी पाहिे असेल. मात्र यावेळेस जेव्हा ते ट्रॅक पँट आणि टी शर्टमध्ये हार्ले डेविडसनच्या शानदार बाईकवर बसलेले दिसले तेव्हा लोकांन त्यांना नोटीस केले. सध्या मुख्य न्यायाधीश बोबडे नागपूरमध्ये आपल्या घरी आहे आणि ते सुप्रीम कोर्टात येणाऱ्या महत्त्वपूर्णप्रकरणावर सुनावणी करत आहेत. 

रविवारी सकाळी जेव्हा ते मॉर्निंग वॉकसाठी निघाले तेव्हा त्यांची नजर हार्ले डेविडसन बाईकवर पडली आणि त्यांनी लगेचच बाईक ताब्यात घेतली. या दरम्यान लोकांनी त्यांचा फोटो घेतला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच त्यांचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुख्य न्यायाधीश बोबडे यांच्यासाठी ही गोष्ट नवीन आहे. त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता  की त्यांना बाईक आणि कार खूप आवडतात. मुख्य न्यायाधीश बोबडे यांना फोटोग्राफी, क्रिकेट खेळणे आणि पुस्तके वाचायला आवडतात. 

बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ला नागपूरमध्ये झाला. १९७८मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये त्यांनी अधिवक्ता म्हणून रजिस्ट्र्रेशन केले. हायकोर्टच्या नागपूर पीठात त्यांनी २१ वर्षापर्यंत सेवा देणाऱ्या बोबडे यांनी मार्च २०००मध्ये बॉम्बे हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. १६ ऑक्टोबर २०१२मध्ये ते मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले.खासगी आयुष्यात बोबडे यांना फोटोग्राफीची आवड आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी