Happy Holi on Diwali: पाकिस्तान: सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत दिल्या होळीच्या शुभेच्छा

CM of Sindh in Pakistan gets trolled for mixing up festivals पाकिस्तानमधील सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी दिवाळीत होळीच्या शुभेच्छा देण्याची चूक केली.

CM of Sindh in Pakistan gets trolled for mixing up festivals
Happy Holi on Diwali: पाकिस्तान: सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत दिल्या होळीच्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • Happy Holi on Diwali: पाकिस्तान: सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत दिल्या होळीच्या शुभेच्छा
  • सोशल मीडियावर अनेकांनी सिंधच्या मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले
  • शुभेच्छा देण्यासाठी फोटोची निवड करण्यातही चूक

CM of Sindh in Pakistan gets trolled for mixing up festivals । इस्लामाबाद: पाकिस्तानमधील सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी दिवाळीत होळीच्या शुभेच्छा देण्याची चूक केली. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी सिंधच्या मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले. 

दिवाळी आणि होळी हे दोन वेगळे सण आहेत. दोन्ही सण साजरे करण्याची पद्धत निराळी आहे. दोन्ही सणांशी संबंधित सांस्कृतिक संदर्भांमध्येही फरक आहे. पण या फरकाचे भान न राखता सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत होळीच्या शुभेच्छा देण्याची चूक केली. अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेली ही चूक सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांना भोवली आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्वीट केलेल्या इमेजचा स्क्रीनशॉट घेऊन अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. चूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरुन होळीच्या शुभेच्छा देणारे ट्वीट काढून टाकले.

एक चूक जी अनेकांच्या लक्षात आली नाही!

सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त शुभेच्छा देण्यातच चूक केली नाही तर फोटोची निवड करण्यातही चूक केली. पण ही चूक अनेकांच्या लक्षात आली नाही. सिंधच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देण्यासाठी वापरलेल्या फोटोत एक क्रेन दिसत आहे. कोणत्याही सणाशी क्रेनचा संबंध नाही. पण मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देण्यासाठी स्वतःचा जो फोटो वापरला त्यात क्रेन स्पष्ट दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी