'ड्रॅगन फ्रूट' नाही 'कमलम', सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदलले आहे, त्यांनी या फळाचे नामकरण 'कमलम' असे केले आहे. ज्यावरुन आता सोशल मीडियामध्ये अनेक मीम्स तयार झाले आहेत.

 kamalam
'ड्रॅगन फ्रूट' नाही 'कमलम', सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बदलले ड्रॅगन फ्रूटचे नाव
  • ड्रॅगन फ्रूट याला रुपाणी यांनी कमलम असे नाव दिले आहे
  • यामध्ये काहीही राजकीय नसल्याचा दावा देखील मुख्यमंत्री रुपाणींनी केलेला आहे.

मुंबई: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी देशात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या 'ड्रॅगन फ्रूट'चं या विशिष्ठ फळाचे नाव बदलून 'कमलम' असे केले आहे. मुख्यमंत्र्यांनी यामागचे कारण काय आहे हे देखील  सांगितले आहे. परंतु सोशल मीडिया यूजर्संना या फळाचे नाव बदलणे अजिबात आवडलेले दिसत नाही. कारण यावरुन आता अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. तसंच यावरुन भाजपला ट्रोल देखील केलं जात आहे.

कमलमचे हे नाव बदलण्याच्या निर्णयानंतर तात्काळ ट्विटरवर मीम्सचा पूर आला आणि एकामागून एक मजेदार मीम्स शेअर होऊ लागले ज्यामध्ये लोकांनी याबाबत बराच आनंद लुटला आहे.

ज्या फळाचं नाव ड्रॅगन फ्रूटऐवजी 'कमलम' ठेवण्याची घोषणा  केली आहे ते एक उष्णकटीबंधीय फळ आहे. मूलतः हे मध्य अमेरिकेतील फळ आहे, परंतु आता जगातील बर्‍याच देशांमध्ये त्याची लागवड केली जाते. अलिकडच्या वर्षांत बाजारात हे फळ वेगाने उदयास आले आहे. त्याची विशेष चव आणि वेगळ्या आकारामुळे हे फळ लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.

गुजरातमधील शेतकरी या फळाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यामुळे याचे उत्पादन देखील अधिक आहे. हे फळ 'पिताया' म्हणून देखील ओळखले जाते. भारतीय बाजारात ते प्रतिकिलो ३५० ते ५०० रुपयांपर्यंत विकले जाते.

हे दमा आणि मधुमेहासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. यात कर्करोगविरोधी घटकही असल्याचे म्हटले जाते. तसेच उतारवयात हे फळ खाल्ल्यास त्याचा शरीराला अधिक फायदा होतो. 

सीएम रुपाणी म्हणाले की, 'ड्रॅगन हे नाव कोठे तरी चीनशी संबंधित आहे. म्हणून हे नाव या फळासाठी योग्य वाटत नाही. यामुळेच सरकारने ते बदलून 'कमलम' करण्याचा निर्णय घेतला.'

ते म्हणाले की या फळाचे बाह्य आवरण कमळसदृश आहे आणि त्याचा रंग कमळ फुलांच्या समान आहे, म्हणून सरकारने त्याचे नाव बदलून 'कमलम' असे करण्याचा निर्णय घेतला.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारने या फळाच्या 'कमलम' नावाच्या पेटंटसाठीही अर्ज केला आहे. ते म्हणाले की कमलम हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ कमळ आहे. यात राजकीय काहीही नाही, असेही ते म्हणाले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी