आता आलेय 'झुरळ चॅलेंज', इंटरनेटवर होतंय व्हायरलं

व्हायरल झालं जी
Updated May 08, 2019 | 21:43 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एक नवे चॅलेंज सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. यात तुम्हाला चेहऱ्यावर झुरळ ठेवायचे असते. सोशल मीडियावर हे चॅलेंज चांगलेच व्हायरल होत आहे.

cocroach
झुरळ चॅलेंज  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: जर तुम्हाला एखाद्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे अथवा तुम्ही एखाद्या स्पर्धेच्या शोधात आहात तर इंटरनेटशिवाय वेगळी कोणती जागाच असू शकत नाही. आईस बकेट पासून ते mannequins to Harlem shake, Cinnamon and bottle flip हे सर्व चॅलेंज गेम सोशल मीडियावर आले आहेत. सध्या आणखी एक चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या विचित्र चॅलेंजचे नाव आहे झुरळ चॅलेंज. या चॅलेंजमध्ये तुम्हाला चेहऱ्यावर झुरळ टाकायचे असते. हे चॅलेंज समजताच अनेकांनी आपल्या चेहऱ्यावर झुरळ ठेवत याच फोटो ट्विटर आणि फेसबुकवर वेगाने व्हायरल होत आहेत. 

फेसबुक युझर्स अॅलेक्स आंगने २० एप्रिलला आपल्या चेहऱ्यावर झुरळासोबत आपला फोटो पोस्ट केल्यानंतर हे चॅलेंज  सुरू झाले होते. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, नवे चॅलेंज, तुम्ही हे करू शकता का? त्याची ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आणि इतर युजर्सनीही स्वत:च्या चेहऱ्यावर झुरळ ठेवत हे चॅलेंज स्वीकारत याचे फोटो शेअर करण्यास सुरूवात केली. 

यातील हे काही फोटोज...


आता फेसबुक आणि ट्विटरवर असा फोटो दिसला आहे ज्यात स्पर्धकाने तोंडात झुरळ घेतले आहे. 

हे चॅलेंज म्यानमार, फिलिपाईन्स आणि इंडोनेशिया यांसारख्या देशात पसरले आहे. येथे तरूण-तरूणी स्वत:च्या चेहऱ्यावर झुरळ टाकत हे चॅलेंज स्वीकारत आहे. तसेच आपले फोटोही पोस्ट करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आता आलेय 'झुरळ चॅलेंज', इंटरनेटवर होतंय व्हायरलं Description: एक नवे चॅलेंज सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. यात तुम्हाला चेहऱ्यावर झुरळ ठेवायचे असते. सोशल मीडियावर हे चॅलेंज चांगलेच व्हायरल होत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola