Lip lock video viral: कॉलेज विद्यार्थ्यांचं लीप लॉक चॅलेंज, व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग...

College students lip lock video viral: कॉलेजमधील मुलांचा लिप लॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. 

college students orgnise lip lock challenge in karnataka video goes viral and one arrested by police
कॉलेज विद्यार्थ्यांचं लीप लॉक चॅलेंज, Lip lock चा व्हिडिओ व्हायरल झाला आणि...  |  फोटो सौजन्य: IANS
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ठेवलं लिप-लॉक चॅलेंज 
  • लिप-लॉक करण्याचा व्हिडिओ व्हायरल
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी केली अटकेची कारवाई

College student arrest after lip lock video viral: कर्नाटकमध्ये एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे ज्यामध्ये विद्यार्थी लिप लॉक करताना दिसत आहेत. व्हिडिओत दिसणारे हे विद्यार्थी एका नामांकित कॉलेजमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या लिप लॉकचा व्हिडिओ व्हायरल (Lip lock video viral) झाल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करण्यात आली आहे. (college students orgnise lip lock challenge in Karnataka video goes viral and one arrested by police)

कर्नाटकातील एका नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत विद्यार्थी लिप लॉक करताना दिसत आहेत. तर इतर काही लोकही त्या व्हिडिओत उभे दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक कॉलेजचा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी लिप लॉक करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उपस्थित इतर जण त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत.

अधिक वाचा : Viral Video : पतीच्या मोबाईलमध्ये वाजला अलार्म, पत्नीने ‘असं’ झोपवलं की पुन्हा उठलाच नाही

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर वाद वाढला

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आणखी वाद वाढला आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी लिप लॉक व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या एका मुलाला अटक केली आहे. हा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्यानेच शूट केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर कुणी तरी हा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केला.

अधिक वाचा : वारंवार जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत घडली अनपेक्षित घटना

विद्यार्थ्यांनी आयोजित केली लिप-लॉक स्पर्धा

सूत्रांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी लिप-लॉक स्पर्धा आयोजित केली होती. हे सर्व विद्यार्थी तेथे जमले होते. ते एका नामांकित कॉलेजचे असल्याचं सांगितले जात आहे. त्याचसोबत या घटनेच्या वेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते का याचाही पोलीस तपास करत आहेत.

हा व्हिडिओ एका घरातील खोलीत शूट करण्यात आला आहे. या खोलीत मुलगा-मुलगी व्यतिरिक्त इतर विद्यार्थी दिसत आहेत. अनेक विद्यार्थी हे लिप-लॉक करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीला चिअर करताना दिसून येत आहेत. या लिप-लॉकच्या व्हिडिओने संपूर्ण कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी