Viral News : कंपनीने बीएसईला लिहिले पत्र...सांगण्यास आनंद आहे की, आमच्या प्रमोटरचे निधन झाले, पाहा काय आहे गंमत

Viral Letter : सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी छोटीशी बाबदेखील बघता बघता जगभर पसरते. सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही ना काही विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत एका कंपनीसोबत असा प्रकार घडला आहे, ज्यामुळे ती सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. तुमच्या माहितीसाठी ही कंपनी राजस्थानची आहे. या कंपनीकडून शेअर बाजाराला (Share Market) माहिती कळवताना नकळत एक मोठी चूक झाली आहे. या कंपनीच्या चुकीचा पुरावा सोशल मीडियावर फोटोंच्या माध्यमातून जबरदस्त व्हायरल (Viral) होतो आहे.

Viral letter of Promoter's Death
कंपनीच्या प्रमोटरच्या निधनाचे व्हायरल पत्र 
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही ना काही विचित्र गोष्टी पाहायला मिळतात
  • राजस्थानची एक कंपनी सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली
  • कंपनीकडून शेअर बाजाराला (Share Market) प्रमोटरच्या निधनाची माहिती कळवताना नकळत एक मोठी चूक झाली आहे.

Trending letter of Promoter's Death :नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी छोटीशी बाबदेखील बघता बघता जगभर पसरते. सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही ना काही विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत एका कंपनीसोबत असा प्रकार घडला आहे, ज्यामुळे ती सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. तुमच्या माहितीसाठी ही कंपनी राजस्थानची आहे. या कंपनीकडून शेअर बाजाराला (Share Market) माहिती कळवताना नकळत एक मोठी चूक झाली आहे. या कंपनीच्या चुकीचा पुरावा सोशल मीडियावर फोटोंच्या माध्यमातून जबरदस्त व्हायरल (Viral) होतो आहे. कंपनीकडून चुकीचा फॉर्मेट वापरून निधनाची बातमी कळवताना भलतीच चूक झाली आहे. पाहूया काय आहे ही चूक आणि त्यातून झालेली फजिती. (Company letter to share market about death of promoter goes viral)

अधिक वाचा : Weight Loss Success Story : कधी काळी लठ्ठपणामुळे या अभियंत्याला घालावी लागत होती लुंगी, आता घटवले 27 किलो वजन...पाहा कसे

कंपनीने काय केली चूक

सोशल मीडियावर सर्वत्र एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे ज्यामध्ये या कंपनीने पाठवलेल्या पत्राचे काही शब्द हायलाइट केले आहेत. हा फोटो पाहून तुम्हालाही वाटेल की, कोणतीही कंपनी अशा प्रकारे चूक कशी काय करू शकते. आघाडीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर ट्रेंड होत असलेला हा स्क्रीनशॉट पाहा...

अधिक वाचा : भावा जिंकलंस! Rohit sharma ने लोखंडी जाळीच्या पलिकडे उभ्या असलेल्या पाकिस्तानी फॅनला दिली 'जादू की झप्पी'

कंपनीच्या मालकाच्या मृत्यूचा आनंद पत्रात

कंपनीने चुकून टाईप केले की त्यांचे प्रवर्तक आता या जगात नाहीत हे सांगण्यास त्यांना आनंद होत आहे. त्याऐवजी त्यांनी टाईप करायला हवे होते की कंपनीला त्यांचे संस्थापक या जगात नाहीत हे सांगताना त्यांना खेद वाटतो. या चुकीमुळे अर्थाचा अनर्थ झाला आहे. कंपनीच्या कार्यालयाकडून एखादा भलताच फॉर्मेट निधनाचे वृत्त कळवण्यासाठी कॉपी पेस्ट झालेला दिसतो आहे. आता या कंपनीची चूक सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. 

व्हायरल झालेला पत्राचा फोटो

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की प्रिय गुंतवणुकदारांनो, हे जग एका क्रूर ठिकाण आहे. जुने टेम्प्लेट/चुकीचे टेम्प्लेट  कंपनीने वापल्यास अर्थ कसा बदलतो ते पाहा.

अधिक वाचा : First Iphone Auction : पहिल्यावहिल्या आयफोनचा लिलाव, इतक्या लाखांची लागली बोली

सोशल मीडियावर या पत्राचा एक स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या पत्रातमध्ये या कंपनीने पाठवलेल्या पत्राचे काही शब्द हायलाइट केले आहेत. या पत्राकडे पाहून तुम्हालाही वाटेल की, अशा प्रकारची चूक कोणतीही कंपनी कशी काय करू शकते. आघाडीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवर हे पत्र ट्रेंड होते आहे. या पत्राला तुम्ही पाहिल्यास तुम्हीदेखील थक्क व्हाल. एखादी शेअर बाजारात नोंदणी असलेली कंपनी एव्हढी मोठी चूक अशा महत्त्वाच्या प्रसंगी कशी काय करू शकते, याचेच सर्वांना आश्चर्य वाटते आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पत्र टाइप करताना केलेल्या कॉपी पेस्टच्या चुकीमुळे कंपनीचीच थट्टा होते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी