Costliest Sweet in Delhi : नवी दिल्ली : मिठाई (Sweet)हा अनेकांचा वीक पॉइंट असतो. मिठाई खाणे सर्वांनाच आवडते. मात्र दिल्लीतील एक मिठाई (Most Expensive Sweet in New Delhi) आणि त्याचा भाव ऐकलात तुम्ही आश्चर्याने तोंडात बोटे घालाल. या खास मिठाईचा भाव आहे १६,००० रुपये प्रति किलो. सोशल मीडियावर (Social Media)या मिठाईची मोठी चर्चा होते आहे. या मिठाईची खास रेसेपी आहे. चटकन पाहता कदाचित ही मिठाई इतर मिठाईसारखीच दिसेल, मात्र ही मिठाई एकदम खास आहे. पाहूया दिल्लीतील या महागड्या मिठाईचे वैशिष्ट्ये. (Cost of this special sweet with 24 carat gold in New Delhi is Rs 16,000, check the details)
दिल्लीतील या मिठाईविषयी जाणून तुम्ही थक्क व्हाल. दिसायला जरी इतर मिठायांप्रमाणेच असली तरी या मिठाईची वैशिष्ट्ये जाणल्यावर तुम्ही म्हणाल ही मिठाई आहे की खरे सोने. सध्या सोशल मीडियावर या मिठाईची दणकून चर्चा होते आहे. या मिठाईचे फोटो दणकून व्हायरल होत आहेत. एवढी चर्चा होत असलेल्या या खास मिठाईचे नाव तरी काय आहे? तर या मिठाईचे नाव आहे गोल्ड प्लेटेड (Gold Plated sweet)मिठाई. ही गोल्ड प्लेटेड मिठाई खास पद्धतीने बनवली जाते. यामध्ये काजू, पिस्ता, बदाम, केसर याबरोबरच २४ कॅरेट सोन्याचा थर दिला जातो.
ही मिठाई बनवण्यामागे एक खास कारण आहे. ही मिठाई दिल्लीतील मौजपूरस्थित शगून स्वीट्सने बनवली आहे. शगून स्वीट्सने पहिल्यांदा ही मिठाई एका ग्राहकाच्या खास डिमांडनुसार बनवली होती. शगून स्वीट्सचे मालक मुकेश बंसल आणि नितीन बंसल यांच्या म्हणण्यानुसार एकदा एका ग्राहकाने त्यांच्याकडे या प्रकारची खास मिठाई बनवून देण्याची डिमांड केली होती. मुकेश बंसल आणि नितीन बंसल त्या ग्राहकाची डिमांड ऐकून थक्क झाले. मात्र नंतर त्यांनी विचार केला की एकदा या प्रकारची मिठाई बनवून पाहायला काय हरकत आहे. ही नवीन मिठाई बनवण्यासाठी त्यांना एक महिन्याचा कालावधी लागला. मात्र त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आणि ही आगळी वेगळी जबरदस्त मिठाई बनून तयार झाली.
नितीन बंसल यांनी सांगितले की त्यांना आधी याची भीती वाटत होती की या प्रकारची आणि इतकी प्रचंड महागडी मिठाई विकली जाणार की नाही. मात्र जेव्हा लोकांना ही गोल्ड प्लेटेड मिठाई आवडली आणि त्यांच्याकडून याची मागणी होऊ लागली, तेव्हा बंसल निर्धास्त झाले. त्यांनी सांगितले की गोल्ड प्लेटेड मिठाईमध्ये एक किलोमध्ये जवळपास २० पीस येतात. म्हणजेच या मिठाईच्या एका पीसची किंवा एका तुकड्याची किंमत आहे जवळपास ८०० रुपये. शगून स्वीट्सच्या नितीन बंसल यांनी म्हटले की आता ते आणखी एक नवीन मिठाई बनवण्यावर काम करत आहेत. या नव्या मिठाईची किंमत गोल्ड प्लेटेड मिठाईपेक्षादेखील जास्त असू शकणार आहे.