LIVE मॅच दरम्यान स्टेडियममध्येच दाम्पत्याचे शारीरिक संबंध, 6 सेकंदांच्या VIRAL VIDEO ने खळबळ

Couple made physical relation during match in stadium: मॅच सुरू असताना स्टेडियममध्ये असलेल्या एका दाम्पत्याने असं काही कृत्य केलं की त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

couple intimate in stadium during live match of baseball incident caught in camera
LIVE मॅच दरम्यान स्टेडियममध्येच दाम्पत्याचे शारीरिक संबंध, 6 सेकंदांच्या VIRAL VIDEO ने खळबळ (PHOTO: Navbharattimes.com) 
थोडं पण कामाचं
  • मॅच दरम्यान दाम्पत्याने स्टेडियममध्ये ठेवले शारीरिक संबंध
  • दाम्पत्याचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
  • दाम्पत्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता

Intimate couple may face action after viral video: सोशल मीडियात एका दाम्पत्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 5 ते 6 सेकांदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. झालं असं की, हे दाम्पत्य एक बेसबॉल मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आणि त्यानंतर तेथे त्यांनी जे काही केलं त्यामुळे एकच खळबळ उडाली.

असं म्हटलं जातं की, प्रेम आंधळं असतं. असाच काहीसा प्रकार ऑकलंडमधून समोर आला आहे. ऑकलंड येथील सेंट्रल कोलिसम स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक आले होते. ऑकलंड एथलेटिक्स आमि सीटल मरीन्स यांच्यात ही बेसबॉल मॅच होती. स्टेडियम जवळपास अर्ध रिकामं होतं. याचाच फायदा घेत एक दाम्पत्य इन्टिमेट झालं आणि त्यांनी थेट स्टेडियममध्येच शारीरिक संबध ठेवण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा : ...ती भेटायला आली अन् Kiss घेऊन गेली, पोलिसांनी पकडून टाकलं तुरुंगात

ही घटना 21 ऑगस्ट रोजीची आहे. ही मॅच रिंगसेंट्रल कोलिजियम स्टेडियममध्ये सुरू होती. या दाम्पत्याने शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली आणि ती घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली. एका अज्ञाताने हा व्हिडिओ शूट केला आणि तो अवघ्या काही क्षणांत व्हायरल झाला. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या प्रकरणाची माहिती पोलिसांनाही मिळाली. या प्रकरणानंतर पोलिसांनीही आपला तपास सुरू केला. ऑकलंड पोलीस डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात तपास सुरू आहे. ही मॅच संपेपर्यंत आम्हाला याबाबतची माहिती नव्हती. आता या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर तपास सुरू केला आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येऊ शकते.

TMZ च्या रिपोर्ट्सनुसार, जर हे दाम्पत्य दोषी आढळलं तर त्यांना जवळपास 6 महिन्यांपर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा 80 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जावू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी