Viral Wedding Card: जोडप्याने भारतीय सैन्याला दिलं लग्नाचं आमंत्रण! लग्नपत्रिकेतील मजकूराने जिंकली मने...फोटो झाला व्हायरल

Viral post : अनेकदा थोरामोठ्यांच्या घरच्या लग्नकार्याच्या नेत्रदिपक आणि महागड्या लग्नपत्रिकांची खूप चर्चादेखील होते. तुम्ही आतापर्यत असंख्य लग्नपत्रिका पाहिल्या असतील. मात्र अशी अनोखी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल. सध्या या अनोख्या लग्नपत्रिकेची चर्चा होते आहे. सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका व्हायरल (Viral wedding card) झाली आहे. ज्या जोडप्याच्या लग्नाची ही लग्नपत्रिका आहे ते जोडपे केरळचे आहे.

viral wedding card
व्हायरल लग्नपत्रिका  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • जोडप्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर झाली व्हायरल
  • लग्नपत्रिकेत भारतीय सैन्याला दिले आमंत्रण
  • पत्रिकेतील मजकूराने जिंकली सर्वांची मने

Wedding Invitation to Indian Army:नवी दिल्ली : लग्नकार्य म्हटले की लगीनघाई आलीच. लग्नाच्या कामातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाचे आमंत्रण (Wedding Card). त्यासाठी लग्नपत्रिका छापली जाते. लग्नपत्रिका कशी दिसावी, त्यात काय काय छापावे, कोणाचे नाव असावे याबद्दल खूप चर्चाही होते. अनेकदा थोरामोठ्यांच्या घरच्या लग्नकार्याच्या नेत्रदिपक आणि महागड्या लग्नपत्रिकांची खूप चर्चादेखील होते. तुम्ही आतापर्यत असंख्य लग्नपत्रिका पाहिल्या असतील. मात्र अशी अनोखी लग्नपत्रिका तुम्ही कधी पाहिली नसेल.  सध्या या अनोख्या लग्नपत्रिकेची चर्चा होते आहे. सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका व्हायरल (Viral wedding card) झाली आहे. अशी लग्नपत्रिका तुम्ही पाहिली नसेल. ज्या जोडप्याचे हे लग्न आहे त्यांनी लग्नपत्रिकेत भारतीय सेनेसाठी (Indian Military) या लग्नपत्रिकेत खास जागा ठेवली आहे. केरळच्या या लग्नपत्रिकेने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली आहे. (Couple invited Indian Military for wedding, the content in wedding card gone viral)

अधिक वाचा  : महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील,'शिवाजी तर जुने झाले'

खास लग्नपत्रिका

ज्या जोडप्याच्या लग्नाची ही लग्नपत्रिका आहे ते जोडपे केरळचे आहे. 10 नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न झाल्याचे सांगण्यात येते आहे. यातील वराचे नाव राहुल आणि वधूचे नाव कार्तिका आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची पत्रिका भारतीय लष्कराला हस्तलिखित चिठ्ठीसह पाठवली. या लग्नपत्रिकेचा फोटो खूप व्हायरल झाला आहे. 

अधिक वाचा  : लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी करा हे तुळशीचे उपाय

भारतीय लष्कराला आमंत्रण

या खास लग्नपत्रिकेत या जोडप्याने लिहिले आहे की, देशासाठी असलेले तुमचे प्रेम, दृढनिश्चय आणि खऱ्या देशभक्तीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. या लग्नपत्रिकेत पुढे म्हटले आहे की तुझ्यामुळे आम्ही शांत झोपू शकतो. आमच्या प्रियजनांसह आम्हाला आनंदी दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळेच आमचं लग्न झालंय. आमच्या या लग्नाच्या विशेष दिवशी तुम्हाला आमंत्रण देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे.

व्हायरल झाला लग्नपत्रिकेचा फोटो

भारतीय लष्कराने सोशल मीडियावर याला प्रतिसाद दिला आहे. लष्कराने इन्स्टाग्रामवर लग्नाचे आमंत्रण पोस्ट करत लिहिले, 'शुभेच्छा #IndianArmy लग्नाच्या आमंत्रणासाठी राहुल आणि कार्तिकाला धन्यवाद देते. आम्ही जोडप्याला आनंदी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देतो. अशी या खास आणि अनोखी लग्नपत्रिकेचा फोटो जबरदस्त वेगाने व्हायरल होतो आहे. 

अधिक वाचा  : शरद पोंक्षेंची अंदमानातून राहुल गांधींवर टीका

एरवी लग्नाचा थाटमाट, झगमगाट आणि ऐश्वर्य संगळ्यांना दाखवून नातेवाईकांचे डोळे दिपवून टाकण्याचा प्रयत्न असतो. अलीकडे तर प्री वेडिंग फोटोशूटवरदेखील लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र अनेकदा आपल्या आजूबाजूचे लोक ज्यांच्यामुळे आपण मोठे होतो त्यांची जाणीव ठेवली जात नाही. अशावेळी भारतीय सैन्याची आठवण येणे ही अतिशय मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच ही लग्नपत्रिका आणि त्यातील मजकूर सगळ्यांच्याच मनाला भिडला आहे. आपल्या लग्नप्रसंगी सामाजिक भान जपण्याचा संदेशच या जोडप्याने दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी