किस करताना कपल पडले नदीत, व्हिडिओ झाला व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Apr 19, 2019 | 14:43 IST | Times Now

केरळमध्ये एका प्री वेडिंग शूटच्या दरम्यान एक कपल बोटीमध्ये बसून एकमेकांना किस करत असताना नदीत पडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

couple fell down in river during kiss
किस करताना जोडपे पडले नदीत...  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: हल्ली लग्नाआधी प्रीवेडिंग शूट करणे सगळीकडेच कॉमन झाले आहे. कपल लग्न ठरल्यानंतर एकमेकांप्रती प्रेम भावना दाखवण्यासाठी प्री वेडिंग शूट करतात. ही जणून काही फॅशनच बनली आहे. विविध संकल्पनांवर आधारित असे हे प्री वेडिंग शूट वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. काहीजण तर हटके प्री वेडिंग शूट करण्यासाठी काहीही करतात. असाच एक प्री वेडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सध्या केरळमधील एक कपल इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे आणि हे कोणत्या कारणामुळे ते ऐकून तुम्हालाच हसू येईल. 

हे कपल बोटीमध्ये बसून एकमेकांना किस करत होते. किस करता करता बोट उलटली आणि दोघेही नदीत पडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा व्हायरल व्हिडिओ आहे तिजिन आणि सिल्पा या जोडप्यांचा. येत्या ६ मेला हे दोघेही लग्नगाठ बांधत आहेत. त्यांच्या प्री वेडिंगचे शूट कडाम्मनिट्टा येथील पम्बा नदीत सुरू होते. 

 

 

व्हिडिओमध्ये दिसतंय की, फोटोग्राफर नदीत बसलेल्या कपलना इन्स्ट्रक्शन देत आहे. तसेच त्यांना किस करण्यास सांगतो. या दोघांनी हातात डोक्यावर केळीचे पान पकडले आहे आणि त्यांच्यावर पाणी उडवले जात आहे. यातच जेव्हा नवरामुलगा तिला किस करण्यासाठी जातो तेव्हा दोघेही बॅलन्स गमावतात आणि पाण्यात पडतात. 

या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चार हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. दरम्यान, फोटोग्राफरने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व ठरवलेले होते. मात्र त्या कपलला याची काहीच माहिती नव्हती. त्यांना ते अपघाताने झाले असेच वाटले. मात्र ही घटना घडत असताना त्यांचे नैसर्गिक भाव टिपायचे होते. म्हणूनच फोटोग्राफरने ही संकल्पना साकारली. 

जेव्हा ते कपल पाण्यात पडले तेव्हा त्यांच्यासह तेथील उपस्थितांना हसू काही आवरत नव्हते. संपूर्ण शूट पार पडल्यानंतर फोटोग्राफरने पाण्यात पडण्याचा हा किस्सा मुद्दाम घडवून आणल्याचे सांगितल्यावर कपल म्हणाले की आम्ही तू खूप एन्जॉय केलं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
किस करताना कपल पडले नदीत, व्हिडिओ झाला व्हायरल Description: केरळमध्ये एका प्री वेडिंग शूटच्या दरम्यान एक कपल बोटीमध्ये बसून एकमेकांना किस करत असताना नदीत पडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Loading...
Loading...
Loading...