Viral Video : फिल्मी स्टाईलने एंट्री घेत होते वधू आणि वर, क्रेन पडल्याने झाला अपघात, व्हिडीओ व्हायरल

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका लग्न समारंभात अपघात झाला आहे. लग्नाचे क्षण खास होण्यासाठे वधू आणि वराची स्टेजवर ग्रँड एंट्री करण्यात आली. परंतु या फिल्मी एंट्रीच्या नादात क्रेन कोसळली आणि वधू आणि वर जमिनीवर आदळले.

wedding viral video
व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • लग्न समारंभात अपघात झालाआहे.
  • वधू आणि वराची स्टेजवर ग्रँड एंट्री करण्यात आली
  • फिल्मी एंट्रीच्या नादात क्रेन कोसळली आणि वधू आणि वर जमिनीवर आदळले

Viral Video : रायपूर :  छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका लग्न समारंभात अपघात झाला आहे. लग्नाचे क्षण खास होण्यासाठे वधू आणि वराची स्टेजवर ग्रँड एंट्री करण्यात आली. परंतु या फिल्मी एंट्रीच्या नादात क्रेन कोसळली आणि वधू आणि वर जमिनीवर आदळले. या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला. सुदैवाने यात दोघांनाही गंभीर जखम झाली नाही. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Couple wedding entry crain break viral video chhatisgarh

ग्रँड एंट्रीच्या वेळी अपघात

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रायपूरमधील तेलीबांधा भागात एका हॉटेलमध्ये लग्ना समारंभ होता. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे या लग्नाच्या आयोजनाची जवाबदारी होती. वधू वर जेव्हा स्टेजवर आले तेव्हा त्यांची ग्रँड एंट्री झाली. वधू वर एका गोलाकार झोक्यात उभे होते, स्टेजवर आतिषबाजी झाली. तेव्हा वधू वर उभे असलेला झोका क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आला. परंतु तेव्हा अचानक क्रेनची रश्शी तुटली आणि हा झोका खाली कोसळला. त्यात वधू आणि वर स्टेजवर आदळले.

झोका खाली कोसळल्यानंतर उपस्थितांनी स्टेजकडे धाव घेतली. सुदैवाने दोघांना गंभीर मार नाही लागला. थोड्या वेळेसाठी उपस्थित पाहुणे घाबरले होते. परंतु थोड्यावेळानंतर संपूर्ण स्थिती सर्वसामान्य झाली. अपघाताच्या अर्ध्या तासानंतर समारंभ पुन्हा सुरू झाला. दरम्यान ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

इव्हेंट मॅनेजमेंटने घेतली जवाबदारी

या अपघातानंतर इव्हेंट मॅनेजमेंटच्या कर्मचार्‍यांना धारेवर निभावले. असे असले तरी याबाबत कुठलीही तक्रार पोलिसांत दाखल झाली नाही. इव्हेंट मॅनेजमेंटच्या कर्मचार्‍यांनी या घटनेची जवाबदारी घेतली असून माफी मागितली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी