इसाप नीतीच्या गोष्टीतील हुशार कावळा सापडला, व्हिडिओ व्हायरल

इसाप नीतीमधील लहानपणी आपण हुशार कावळ्याची गोष्ट ऐकली असेल. पण कावळा असे तळाला असलेले पाणी खडे टाकून वर आणू शकतो का यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 crow has a degree in physics crow video viral in social media
इसाप नीतीच्या गोष्टीतील हुशार कावळा सापडला, व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
  • एका तहानलेल्या कावळ्याचा हा व्हिडिओ आहे.
  • हा व्हिडिओ पाहून तुम्हाला लहानपणी ऐकलेली हुशार कावळ्याची गोष्ट नक्कीच आठवेल

नवी दिल्ली :  इसाप नीतीमधील लहानपणी आपण हुशार कावळ्याची गोष्ट ऐकली असेल. पण कावळा असे तळाला असलेले पाणी खडे टाकून वर आणू शकतो का यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे हुशार कावळ्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका तहानलेल्या कावळ्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला लहानपणी ऐकलेली हुशार कावळ्याची गोष्ट नक्कीच आठवेल. तसंच काही वर्षांपूर्वी एका कोल्ड्रिंक्सच्या जाहिरातीतही तहानलेल्या कावळ्याची संकल्पना वापरून जाहिरात करण्यात आली होती. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही खराखुरा हुशार कावळा पाहू शकणार आहेत. तर पाहू या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला व्हिडिओ.... 


तुम्ही पाहू शकता या व्हिडिओत एका पारदर्शी बाटलीत पाणी निम्म्यापेक्षा अधिक भरलेले आहे.  तहानलेल्या कावळ्याला पाणी जरा खाली असल्यामुळे पिणे अवघड झाले आहे. ते बाटलीतील पाणी आपल्या चोचेपर्यंत पोहचावे यासाठी कावळ्याची डोक्यात ट्यूब पेटली.  जवळच असलेले दगड चोचीतून आणि पाण्यात टाकणे सुरू केले. पहिला दगड टाकल्यावर थोडे पाणी वर आले, त्याने लगेच ते प्यायले. पुन्हा दुसरा दगड आणतो आहे.  दोन ते तीन वेळा कावळ्याने दगड आणून पाण्यात टाकले आणि आपली ताहन भागवली. 

आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला असून १५ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. २ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ १२ सेकंदाचा असून सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी