पुलवामा हल्ल्यातून बचावलेल्या CRPF जवानाचा तो व्हिडोओ होतोय व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 15, 2019 | 16:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

काही दिवसांपूर्वी एका जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत जवान आपल्या डब्यातील जेवण एका मुलाला भरवताना दिसत आहे. यावर मेहबूबा मुफ्तींनी ही प्रतिक्रीया दिली आहे. जाणून घेऊया या मागचं सत्य.

CRPF jawan viral video
सीआरपीएफ जवानाचा व्हिडीओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

काही दिवसांपूर्वी एका जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून मनं हळहळल्याशिवाय राहत नाही. या व्हिडिओत दिसणाऱ्या जवानाचं नाव आहे इकबाल सिंह असून ते सीआरपीफच्या ४९ व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यातून इकबाल सिंह वाचले होते. ज्यावेळी पुलवामा हल्ला झाला त्यावेळी इकबाल सिंह ताफ्यातील एक वाहन चालवत होते. जवानांचा ताफा जेव्हा श्रीनगरच्या दिशेनं जात होता तेव्हा ७८ वाहनांचा समावेश होता. त्याचवेळी ते एका वाहनाचे चालक होते. सिंह यांनी त्यावेळी हल्ल्यात झालेल्या जखमी सैनिकांना वाचवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहिद झाले होते. 

इकबाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. या व्हिडिओमुळे इकबाल सिंह यांच्या कामाची सर्वत्र स्तुती होत आहे. तसंच त्यांना पोलीस महासंचालक म्हणजे डीजी यांनीही प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. ४४ वर्षीय इकबाल सिंह हे सीआरपीएफ ४९ बटालियनचे शिख सैनिक आहेत. इकबाल हे ड्रायव्हर आहेत.  व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, इकबाल सिंह एका बंद दुकानासमोर पायऱ्यांवर बसलेल्या एका लहान मुलाला जेवू घालत आहेत. यावेळी सिंह हे श्रीनगरच्या नवाकगदल येथे कार्यरत होते. 

या घटनेबाबत त्यांना विचारल्यास  इकबाल सिंह यांनी सांगितलं की, मी जेव्हा जेवायला बसलो, तर तिथं समोर एक मुलगा दिसला तो भूकेला दिसत होता. मग त्याला मी  माझ्या डब्ब्यातील जेवण दिलं, पण त्याला ते त्यांच्या हातानं खाता येत नव्हतं, म्हणून मग मी माझ्या हातानं त्याला भरवलं आणि पाणी पाजलं. त्याच दरम्यान कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला.

हा व्हिडिओ कोणी शूट केला आहे अद्याप समजू शकलेलं नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसंच ट्विटरवर ही काही तासातच लाखो लोकांनी रिट्विट केलं आहे. 

‘माणुसकी ही सर्व धर्मांपेक्षा मोठी आहे. ४९ बटालियन श्रीनगर सेक्टरचे सीआरपीएफचे हेड कॉन्स्टेबल ड्रायव्हर इकबाल सिंह यांनी ड्यूटीवर असताना एका लकवा मारलेल्या काश्मिरी मुलाला जेवू घातलं. शेवटी त्याला पाणीही विचारलं आणि पाजलं. शूरवीरपणा आणि करुणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.’ असे श्रीनगर सेक्टर सीआरपीएफनं हा व्हिडिओ ट्विट करत लिहिलं, तसेच या व्हिडिओवर सीआरपीएफनंही आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी लिहिलं, ‘आता असाही एक धर्म असावा, ज्यात माणसाला माणूस बनवलं जातं.’

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणतात, “पोलिसांच्या या ‘दया आणि माणुसकीच्या भावनेला’ मी सलाम करत त्यांच्या या कामाचं कौतुक करते. काश्मीरच्या जवानांना नेहमीच एका नजरेनं बघितलं जातं. मात्र, या व्यक्तीच्या दया आणि माणुसकीच्या भावनेचा मी आदर करते.”

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पुलवामा हल्ल्यातून बचावलेल्या CRPF जवानाचा तो व्हिडोओ होतोय व्हायरल Description: काही दिवसांपूर्वी एका जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत जवान आपल्या डब्यातील जेवण एका मुलाला भरवताना दिसत आहे. यावर मेहबूबा मुफ्तींनी ही प्रतिक्रीया दिली आहे. जाणून घेऊया या मागचं सत्य.
Loading...
Loading...
Loading...