Viral News: डेटवर चल ना राणी... असं म्हणत तरुण 'हिच्या' पाया पडतात, अन् वय...

Woman Date Viral News: एका महिलेने असा दावा केला आहे की, अनेक तरुण तिच्याकडे अक्षरश: प्रेमाची भीक मागतात. तिने एक वेळ डेटवर यावं यासाठी ते तिच्या पायाही पडतात. पण त्यानंतर घडतं काही तरी भलंतच. जाणून नेमकी काय घटना आहे ही.

date with this woman young men fall on their feet Knowing her age it becomes rude viral news update
डेटवर चल ना राणी... असं म्हणत तरुण हिच्या पाया पडतात, अन् वय... (Tiktok) 
थोडं पण कामाचं
  • महिलेवर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी तरुण तळमळतात
  • डेटवर येण्यासाठी महिलेच्या पायाही पडतात
  • महिलेचं खरं वय समजल्यावर बसतो धक्का

Viral News: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर (Tiktok) प्रचंड प्रसिद्ध असलेल्या एका महिलेने दावा केला आहे की, अनेक तरुण मुलं तिच्या प्रेमासाठी (Love) भुकेले आहेत. महिलेचे म्हणणे आहे की, तिला पाहून अनेक तरुण पहिल्याच फटक्यात प्रेमात पडतात. तसंच तिने डेटवर (Date) यावं यासाठी तरुण गयावया करतात, तर कधी तिच्या पायाही पडतात. महिलेने असाही दावा केला आहे की, तरुण मुलं तिच्याकडे प्रेमासाठी अक्षरश: 'भीक' मागतात. तिने एकदा तरी डेटवर यावं यासाठी ते तिला खूप गळ घालतात. मात्र, यानंतर महिलेने जे सांगितले ते खरोखरच धक्कादायक आहे. (date with this woman young men fall on their feet Knowing her age it becomes rude viral)

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ही महिला इतकी सुंदर दिसते की, तिला पाहताच तरुण तिच्यासोबत लग्नाची स्वप्ने पाहू लागतात. महिलेला पाहिल्यावर तरुण तिच्याकडे लागलीच आकर्षित होतात.

अधिक वाचा: सावधान! तुम्हालाही आलाय वीज बिलाचा 'हा' मेसेज?, तर अर्लट व्हा!

याच सगळ्याबाबत महिलेने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने दावा केला आहे की, तरुण तिच्यासोबत डेटवर येण्यासाठी कासावीस असतात आणि अनेक मुलं तिच्या पायाही पडतात. टिकटॉकवर @princessaprilxo नावाच्या महिला युजरने हा विचित्र दावा केला आहे.

प्रेमाची भीक मागतात तरुण मुलं!

महिलेचे म्हणणे आहे की, जोपर्यंत तरुणांना महिलेचे नेमके वय माहित नसते तोपर्यंत तरुण तिला डेट करण्याची प्रचंड विनंती करतात. ती देखील या तरुण मुलांना तिचे वय अजिबात सांगत नाही. महिलेने असाही दावा केला आहे की, जेव्हाही एखादा मुलगा तिला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तो तिच्या सौंदर्याने पूर्णपणे घायाळ होऊन जातो. यानंतर, तो तिच्यासोबत डेटवर जाण्यासाठी, तिच्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. पण, तरुणांना जेव्हा महिलेचे खरे वय कळते तेव्हा ते लागलीच काढता पाय घेतात.

अधिक वाचा: Beauty of Nature : ढगांचं झालं इंद्रधनुष्य! पाहा निसर्गाचा अतिदुर्मिळ चमत्कार, व्हिडिओ होतोय व्हायरल

महिलेने सांगितले आहे की, तिचे वय 44 वर्ष आहे. व्हिडीओ पाहिल्यावर ती महिला 44 वर्षांची असेल असे कुणालाही वाटणार नाही. कारण ती दिसायला अवघी 25 ते 30 वर्षांचीच वाटते. महिलेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिच्या सौंदर्याचे प्रचंड कौतुक करत आहेत. अनेक जण तर तिच्या फिटनेसचं देखील खूपच कौतुक करतात. 

अधिक वाचा: Viral Video : रेल्वे क्रॉसिंगवर थोडक्यात बचावला, बाईकचा झाला चेंदामेंदा 

ऑनलाइन डेट

आजकाल घरबसल्या ऑनलाइन डेटिंगचा ट्रेंड खूपच वाढला आहे. यामध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्या आरामदायी कपड्यांमध्ये जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी बोलू शकता किंवा डेट करू शकता. हाच ऑनलाइन ट्रेंड आता जगभरात वाढतो आहे आणि त्यामुळे अनेकदा अनेक तरुण आपल्या वयाने फार मोठ्या असणाऱ्या महिलांच्या देखील प्रेमात पडतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी