भारतातील 'या' रेल्वे स्टेशनवर नागरिक तिकीट खरेदी करतात मात्र प्रवासच करत नाही

Indian Railways: भारतीय रेल्वे हे जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी रेल्वे हा एक उत्तम पर्याय आहे.

dayalpur railway station here people buys tickets but not travel indian railways read in marathi
भारतातील 'या' रेल्वे स्टेशनवर नागरिक तिकीट खरेदी करतात मात्र प्रवासच करत नाही (Photo: Social Media)  
थोडं पण कामाचं
  • कोणत्या राज्यात आहे हे रेल्वे स्टेशन
  • नागरिक तिकीट खरेदी करुनही का प्रवास करत नाहीत?

Dayalpur Railway Station of Uttar Pradesh in India: भारतीय रेल्वे जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील जवळपास सर्वच भागात ट्रेन चालते. एखादे सामान घेऊन जाणे असो किंवा प्रवाशांना एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल तर रेल्वे हा एक उत्तम पर्याय आहे. भारतात विविध रेल्वे स्टेशन्स आहेत. विचित्र नाव असलेले रेल्वे स्टेशन, भूताटकी असलेलं स्टेशन सुद्धा असल्याचं बोललं जातं. मात्र, भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जेथे नागरिक तिकीट खरेदी करतात पण प्रवासच करत नाहीत.

तिकीट खरेदी करुनही प्रवास नाही

वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल आणि जर प्रवासच करायचा नसेल तर तिकीट खरेदी का करतात? जाणून घेऊयात त्या संदर्भात अधिक... हे रेल्वे स्टेशन उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव दयालपूर असे आहे. दयालपूर रेल्वे स्टेशन भारतातील एकमेव असं स्टेशन आहे जेथे लोक तिकीट खरेदी करतात मात्र, ट्रेनमधून प्रवास करत नाहीत. यामागचं कारण नेमकं काय आहे? जाणून घ्या.

dayalpur Railway Station

(Photo: Social Media)

हे पण वाचा : दूध प्यायल्याने कॅन्सर होऊ शकतो?

दयालपूर रेल्वे स्टेशनच्या निर्मितीची प्रक्रिया 1954 मध्ये सुरू झाली होती. या रेल्वे स्टेशनच्या निर्मितीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका महत्त्वाची होती. 1954 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे दयालपूर रेल्वे स्टेशन निर्मितीच मागणी केली होती. त्यानंतर हे स्टेशन तयार झालं आणि तेथून ट्रेन्सची ये-जा सुरू झाली. प्रवासी सुद्धा ये-जा करु लागले. स्टेशन निर्मिती झाल्यापासून 50 वर्षांपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होतं.

railway station

(Photo: Social Media)

हे पण वाचा : धूम्रपान करणे डोळ्यांसाठीही धोक्याचे

मात्र, 2006 मध्ये दयालपूर रेल्वे स्टेशन हे भारतीय रेल्वेने बंद केलं होतं. हे स्टेशन बंद करताना भारतीय रेल्वेने सांगितले होते की, येथील तिकीट दर हे मानकापेक्षा कमी आहे. त्यानंतर 14 वर्षे हे रेल्वे स्टेशन बंद राहिले. त्यानंतर 2020 वर्ष आलं. खासदार, आमदार आणि स्थानिक लोकांच्या प्रयत्नानंतर हे रेल्वे स्टेशन सुरू झाले. यानंतर हे रेल्वे स्टेशन पुन्हा बंद होईल या भीतीने येथील नागरिक तिकीट खरेदी करतात. नागरिक आपल्या क्षमतेनुसार तिकीट खरेदी करत राहतात पण कुठेही प्रवास करत नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी