Brine Pool Red Sea Death: मध्य पूर्वेत (Middle Ease) मृत समुद्र (Dead Sea) आहे. या जलाशयात १० पट क्षार असल्याने यात कुठलीही प्राणी जगू शकत नाही म्हणून या समुद्राला मृत समुद्र म्हणतात. पण जगात आणखी असा एक जलाशय आहे तो मानवीच नव्हे वर कुठल्याही जिवमात्रांसाठी धोकादायक आहे. या जलाशयात गेल्यावर माणसाचा किंवा प्राण्याचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो.
अधिक वाचा : Viral Video : फ्रेंच, रशियन आणि ब्रिटीश हिंदी बोलू लागले तर काय होईल? पाहा या व्हिडिओत…
समुद्रासंबंधित अनेक रहस्य आणि तथ्य जाणून घेण्यास लोकांना आवडतं. डिस्कवरी चॅनेल (Discover Channel) किंवा नॅशनल जियोग्राफी चॅनेलवर (National Geography) अशा प्रकारे समुद्राच्या तळापर्यंत सागरी जीवन चित्रित केले आहे. जर तुम्हालाही समुद्र पर्यटन आवडत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. संशोधकांनी लाल समुद्रात (Red Sea) एक दुर्मिळ असा जलाशय शोधून काढला आहे की ज्यात कुणीही गेले की त्याचा मृत्यू होऊ शकतो.
संशोधकाच्या एका टीमने लाल सागरात हा जलाशय शोदून काढला आहे. या जलाशयाला संधोधकांनी ‘डेथपूल’ (Death Pool) म्हणजेच मृत्यूचे तलाव असे नाव दिले आहे. या जलाशयात बिल्कूल ऑक्सिजन नाही. तसेच या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने कुठलाही प्राणी या पाण्यात तग धरू शकत नाही. लाल समुद्रात हा तलाव असून त्याची लांबी १० फूट आहे.
अधिक वाचा : Optical Illusion Photo: या फोटोमध्ये आहे एक चूक, शोधून दाखवा १० सेकंदात
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हा जलाशय फक्त मनुष्यांसाठीच नाहीतर समुद्रातील प्राण्यांसाठीही धोकादायक आहे. डेथपूलमधील पाणी सर्वाधिक क्षारयुक्त आहे. पृथ्वीवर कुठपर्यंत जीवन आहे याचा शोध घेण्यासाठी या जलाशयाचा उपयोग होईल. मायामि विद्यापीठाच्या संशोधकांच्या समुहाने हा जलाशय शोधून काढला आहे. या जलाशयात बिल्कूल ऑक्सिजन नाही, इथे मनुष्य किंवा प्राणी गेल्यास दुसर्या क्षणाला बेशुद्ध होऊ शकतो. संधोधकांनी रिमोटली ऑपरेटेड अडरवॉटर वेहिकल या यंत्राच्या माध्यमातून हा जलाशय शोधून काढला आहे. या पुलात कुठलाही मनुष्य अथवा प्राणी गेल्यास त्याचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो. हा शोध महत्त्वाचा मानला जातो कारण आपल्या पृथ्वीवर समुद्राची निर्मिती कशी झाली हे या जलाशयामुळे कळण्यास मदत होईल.
अधिक वाचा : Viral Video : कलियुगातील आधुनिक श्रावणबाळ, आईवडिलांना घेऊन कावडयात्रा