लोकसभेत महागाईवर चर्चा सुरू होताच टीएमसी खासदाराची महागडी बॅग लपवण्याची घाई, व्हिडिओ व्हायरल

लोकसभेच्या (Lok Sabha) पावसाळी अधिवेशनात (Monsoon season) महागाईचा (inflation) मुद्दा गाजत आहे. वाढत्या महागाईमुळे सामन्य जनता सरकारला (government) प्रश्न विचारू लागली आहे. विरोधी पक्षही महागाईवरुन सरकारला जाब विचारत आहे. काल सदनात महागाईवर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. पण नागरिकांविषयी कळवळा वाटून घेणारी नेतेमंडळींना खरंच याच्या झळा लागतात का, हा प्रश्न करण्यामागे कारण म्हणजे महागाईवर चर्चा सुरू होताच टीएमीसी खासदार (TMC MP) आपली महागडी लुई वुईटन बॅग (Louis Vuitton bag) लपव

 As soon as the debate on inflation started in the Lok Sabha, the female MP hid her bag
लोकसभेत महागाईवर चर्चा सुरू होताच महिला MP नं लपवली बॅग  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पावसाळी अधिवेशनात महागाईचा मुद्दा गाजत आहे.
  • लुई वुईटन बॅगेची किंमत दीड लाख रुपयांच्या घरात आहे.
  • तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याकडे लुई वुईटन बॅग आहे.

नवी दिल्ली: लोकसभेच्या (Lok Sabha) पावसाळी अधिवेशनात (Monsoon season) महागाईचा (inflation) मुद्दा गाजत आहे. वाढत्या महागाईमुळे सामन्य जनता सरकारला (government) प्रश्न विचारू लागली आहे. विरोधी पक्षही महागाईवरुन सरकारला जाब विचारत आहे. काल सदनात महागाईवर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. पण नागरिकांविषयी कळवळा वाटून घेणारी नेतेमंडळींना खरंच याच्या झळा लागतात का, हा प्रश्न करण्यामागे कारण म्हणजे महागाईवर चर्चा सुरू होताच टीएमीसी खासदार (TMC MP) आपली महागडी लुई वुईटन बॅग (Louis Vuitton bag) लपवताना दिसल्या. 

Read Also : होणार दूध का दूध और पानी का पानी; पोलिसांनी मागवला मूळ ऑडिओ

तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार काकोली घोष  (MP Kakoli Ghosh) दस्तीगार ह्या महागाईवरुन सरकारला प्रश्न करत होत्या. तर महुआ मोईत्रा ह्या त्यांची लुई वुईटन बॅग लपवत होत्या. महुआ मोईत्रा यांच्याकडे असलेल्या लुई वुईटन बॅगेची किंमत दीड लाख रुपयांच्या घरात आहे. दरम्यान महागाईसाठी गळा काढत असताना मोईत्रा ह्या त्यांच्या पायाजवळ बाकाखाली बॅग लपवत असताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महागाईवरून सरकारला जाब विचारणाऱ्या तृणमूलच्या खासदार इतकी महागडी बॅग कशी काय वापरतात, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. 

Read Also : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ED चा छापा

पावसाळी अधिवेशनात महागाईचा मुद्दा गाजत आहे. विरोधक सातत्यानं सरकारवर निशाणा साधत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसच्या काकोली बोलायला उभ्या राहिलेल्या दिसतात. त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या महुआ मोईत्रा स्वत:ची लुई वुईटन बॅग उचलतात आणि ती पायाजवळ ठेवून देतात.
महुई मोईत्रा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. महागाईवरून सरकारला घेरणाऱ्या खासदार संसदेत इतकी महागडी हँडबॅग कशी आणतात, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. फॅशन ब्लॉग आणि संकेतस्थळांवरील माहितीनुसार, मोईत्रा यांची हँडबॅग जवळपास १.६ लाख रुपयांची आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी