तैवान स्थापना दिनानिमित्त दिल्लीत चिनी दुतावासाबाहेर लावले पोस्टर

Taiwan National Day आज तैनान स्थापना दिन. या निमित्ताने भाजप खासदार तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कमाल केली. त्यांनी दिल्लीतील चीनच्या दूतावासाबाहेर तैवानला शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावले.

Delhi BJP's Tajinder Pal Singh Bagga puts up 'Happy National Day Taiwan' poster near Chinese embassy
दिल्लीत चिनी दुतावासाबाहेर तैवानला शुभेच्छा 

थोडं पण कामाचं

  • तैवान स्थापना दिनानिमित्त दिल्लीत चिनी दुतावासाबाहेर लावले पोस्टर
  • भाजप खासदार तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी लावले पोस्टर
  • बग्गा यांनी ट्वीट करुन दिली माहिती

नवी दिल्ली: आज तैनान स्थापना दिन. या निमित्ताने भाजप खासदार तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कमाल केली. त्यांनी दिल्लीतील चीनच्या दूतावासाबाहेर तैवानला शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावले. बग्गा यांनी ट्वीट करुन पोस्टर झळकावल्याची माहिती दिली. त्यांचे ट्वीट मोठ्या संख्येने रिट्वीट होत आहे. (Delhi BJP's Tajinder Pal Singh Bagga puts up 'Happy National Day Taiwan' poster near Chinese embassy)

चीन तैवानसोबत उत्तम संबंध ठेवणाऱ्या प्रत्येक देशावर कायम नाराज असतो. चीनच्या या वर्तनाचे भान ठेवून भाजप खासदार तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी जाणीवपूर्वक चिनी दूतावासाबाहेर तैवानला शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावले. या पोस्टरबाबत चिनी दूतावासाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. याआधी चीन सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या हाँगकाँगमधील आंदोलकांनी तसेच तैवान सरकारनेही भारत-चीन तणावप्रश्नी भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे. 

चीनचा इतिहास

चीनमधील किंग राजवट उलथवून तिथे लोकशाही राजवट आणण्याचे श्रेय चीनच्या राष्ट्रीय पक्षाच्या सन यत सेन यांच्याकडे जाते. त्यांनी १९३७ मध्ये ही कामगिरी केली. मात्र दुसऱ्या महायुद्धात चीनवर जपानने आक्रमण केले, यात चीनची अभूतपूर्व हानी झाली, १९३९च्या अखेरपर्यंत सुमारे एक कोटी चिनी या युद्धात मारले गेले, असा अंदाज आहे. यानंतर झालेल्या गृहयुद्धात १९४९ मध्ये चीनची सत्ता चिनी साम्यवादी अर्थात कम्युनिस्ट पक्षाने बळकावली. चिनी लोकशाहीवादी राष्ट्रीय पक्षाचे अस्तित्व केवळ तैवान बेटांपुरते मर्यादित राहिले. उर्वरीत चीनवर कम्युनिस्ट पक्षाने ताबा मिळवला. याच कारणामुळे तैवानचे सरकार चीनचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचा दावा करते. कम्युनिस्ट पक्षाने नंतर बौद्धांसाठी पवित्र असलेल्या तिबेटचा १९५१ मध्ये घास गिळला. या नंतर १९६२ मध्ये कम्युनिस्ट चिनी पक्षाच्या सरकारने भारताविरोधात युद्ध पुकारले. अक्साई चीन बळकावला. पाकिस्तानची कायम साथ दिली पण उईघुर मुस्लिम (uighur muslim) अल्पसंख्यांकांचा अमानवी छळ केला. हा छळ आजही सुरू आहे. इंग्रजांकडून हाँगकाँग बेटांचा ताबा १९९७ मध्ये चीनला मिळाला. हा ताबा मिळाल्यानंतर चीनने हाँगकाँगमधील लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना संकटासाठी जगातील अनेक देशांनी चीनला दोषी ठरवायला सुरुवात केली आहे. यानंतर चीनने सर्व शेजारी देशांना त्रास देण्याचे आणि विस्तारवादी धोरण अवलंबिण्याचे सत्र सुरू केले आहे. 

तैवानचा वाद

आशिया खंडाच्या पूर्व भागात, चीनच्या दक्षिण तटावर तैवान नावाचे बेट आहे. या बेटावरील सरकारची सत्ता तैवान आणि आसपासच्या लहान बेटांवर आहे. चीन सरकार या सर्व बेटांना स्वतःचा भूभाग समजते तर १९४९ पासून तैवानने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले आहे. कम्युनिस्ट पार्टी चीनची ओळख पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना अशी करुन देते तर तैवान स्वतःची ओळख तैवान रिपब्लिक ऑफ चायना करुन देतो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ज्यावेळी आशिया खंडातील एका देशाचा समावेश करायचा होता त्यावेळी  तैवानचे नाव पुढे आले होते. मात्र भारताने आशियातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा देश म्हणून चीनचे नाव पुढे केले. भारताच्या या निर्णयाचा गैरफायदा घेत चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकार मिळवला आणि १९६२ मध्ये भू विस्तारासाठी भारतावर युद्ध लादले. तैवान सरकारशीही चीनचे खटके उडू लागले. कोरोना संकटानंतर तर चीनने तैवान आणि भारतासह अनेक शेजारी देशांशी मतभेद ओढवून घेतले आहेत. या घडामोडी घडत असतानाच दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने चिनी दूतावासाबाहेर तैवानला शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावले आहे.

दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरातील घटना

दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात चीनचा दूतावास आहे. या दूतावासाबाहेरच्या रस्त्यावर दिव्याच्या खांबांवर तैवानला शुभेच्छा देणारे पोस्टर झळकावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये मेनलँड चायनाचा नकाशा आहे आणि त्याखाली मोठ्या अक्षरात तैवान असे नमूद आहे. तसेच तैवान या शब्दाखाली 'हॅपी नॅशनल डे' अशा शब्दात तैवानला स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

याआधी भारतातील चिनी दूतावासाने भारतीय माध्यमांनी तैवानला शुभेच्छा देऊ नये कारण जगात एकच चीन देश आहे अशा शब्दात एक प्रेस नोट काढून आवाहन केले होते. या प्रेसनोटला उत्तर म्हणून तैवानला शुभेच्छा देणारे पोस्टर थेट दिल्लीतील चिनी दूतावासाबाहेर झळकावण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी