[VIDEO] 25 हजार रूपयांचा दंड, त्या व्यक्तीनं जाळली बाइक

नवीन ट्रॅफिक नियम लागू झाल्यानंतर पोलीस खूप कडक कारवाई करताना दिसत आहे. ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची आता झोप उडत आहे.

challan rs-25000 For drunk men
[VIDEO] 25 हजार रूपयांचा दंड, जाळून टाकली बाइक  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे
  • ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन केल्यास आता कडक कारवाई करण्यात येत आहे.
  • देशाची राजधानी दिल्लीत अशीच एक कडक कारवाई केली आहे.

नवी दिल्लीः जेव्हापासून ट्रॅफिकचे नवीन नियम लागू झाले आहेत, ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे. ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन केल्यास आता कडक कारवाई करण्यात येत आहे. देशाची राजधानी दिल्लीत अशीच एक कडक कारवाई केली आहे. गुडगावमध्ये काही बाईकस्वारांना ३२ हजार रूपयांपर्यंत चलान मिळालं आहे. तर एक ट्रॅक्टर ट्रॉली चालकाला ५९ हजार रूपयांचा दंड भरावा लागला आहे. दिल्लीचे ट्रॅफिक पोलीस कारवाई करत जो कोणी ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करेल त्यांच्यावर दंड आकारत आहेत. 

आता दिल्लीहून ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीनं आपल्या बाइकला आग लावली आहे. जेव्हा या व्यक्तीला ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून २५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. ही घटना मालवीय नगर पोलीस स्टेशनजवळच्या त्रिवेणी कॉम्प्लेक्समधील असल्याचं बोललं जातं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, आपल्या बाइकला आग लावणारा व्यक्ती नशेत होता. पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या बाइकला आग लावली होती. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांचं म्हणणं आहे की, तो व्यक्ती मद्यपान करून गाडी चालवत होता आणि याच बाबतीत त्याच्यावर दंड आकारण्यात आला होता. काही अन्य ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जेव्हा तो व्यक्ती आपल्या बाइक जाळत होता, त्यावेळी आजूबाजूला मोठ्या संख्येनं लोकांची गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी पीसीआर कॉलवरून या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळासाठी रवाना झाले. मात्र तोपर्यत त्याव्यक्तीनं आपली बाइक जाळली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी बाइकला लागलेली आग विझवली. पोलिसांनी त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

१९८८ च्या मोटार वाहन कायद्यात सुधारणा झाल्यानंतर ट्रॅफिकसंदर्भात नवीन नियम अस्तित्वात आले आहेत. याच महिन्याच्या पहिल्या तारखे  (१ सप्टेंबर) पासून मोटार वाहन दुरुस्ती कायदा २०१९ लागू झाला, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर वाहतूक पोलीस कडक कारवाई करत आहेत. नव्या वाहतूक कायद्यानुसार परवान्याशिवाय वाहन चालविण्याचा दंड ५०० रुपयांवरून ५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच मद्यपान अवस्थेत वाहन चालवण्याकरिता दंडाची रक्कम दोन हजार रुपयांवरून दहा हजार रुपयांवर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] 25 हजार रूपयांचा दंड, त्या व्यक्तीनं जाळली बाइक Description: नवीन ट्रॅफिक नियम लागू झाल्यानंतर पोलीस खूप कडक कारवाई करताना दिसत आहे. ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची आता झोप उडत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola