Metro Women Fighsts : मेट्रोमध्ये सीटसाठी भांडत होत्या दोन महिला, एक महिला प्रवासी आरामात बसून खात होती बर्गर

ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मेट्रोमध्ये दोन महिला सीटसाठी भांडत आहेत

metro fight
मेट्रोमध्ये भांडणे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात.
  • असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
  • एका मेट्रोमध्ये दोन महिला सीटसाठी भांडत आहेत

Girls Fight in  Metro: नवी दिल्ली : ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मेट्रोमध्ये दोन महिला सीटसाठी भांडत आहेत.(delhi metro fight between to women commuter over seat video viral )

अधिक वाचा : Snake Video : मुलावर नागाने उगारला फणा, आईने दाखवली चपळाई! पाहा व्हिडिओ 

सीटसाठी दोघींमध्ये भाडणे

दिल्ली मेट्रोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात दोन महिला सीटसाठी भांडत आहेत. एक महिला आपली बॅग सीटवर बसून तिने जागा अडवली आहे, तर दुसरी महिला तिला बसण्यासाठी जागा दे म्हणून सांगत आहे. असे होत असताना तिसरी महिला बॅग सीटवर ठेवून आरामात बर्गर खात आहे. जणू काही आजूबाला काही घडतच नाही. तिनेही जर बॅग बाजूला ठेवली असती आणि मध्यस्थी केली असती तर भांडणे झाली नसती. परंतु या महिलेला याबद्दल काहीच वाटत नाही. ती आरामात आपला बर्गर खात आहे. 

अधिक वाचा : Viral: पतीला आनंदी ठेवण्यासाठी पत्नी करते विचित्र काम!

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान कुणीतरी ही घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून त्याच व्हिडीओ व्हायरल होत आहे.  Wellu नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच नही जगा है, बहोत जगा है फीमेल वर्जन असे कॅप्शन दिले आहे. काही दिवसांपूर्वी दोन व्यक्तींचा बसमधील असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एक व्यक्ती बसायला जागा नाही तर दुसरा व्यक्ती खुप जागा आहे असे सांगत होता. तो व्हिडीओही व्हायरल झाला होता.

आता या दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी शेअर करत आहेत. या व्हिडीओच्या सुरूवातीला एक महिला मेट्रोमध्ये शिरताना दिसत आहे. ही महिला मेट्रोत शिरल्यानंतर सीट शोधताना दिसत आहे. 

अधिक वाचा : Rakesh Jhunjhunwala Video : व्हीलचेअरवर असतानाही राकेश झुनझुनवालांनी केला होता डान्स, निधनानंतर जुना Video होतोय Viral

हम अपने मस्ती में

सीटसाठी या दोन महिलांची भांडणे सुरू आहेत परंतु तिसर्‍या महिलेला याच्याशी काही देणेघेणे नाही. उभी असलेली महिला बसलेल्या महिलेला बॅग काढायला सांगत आहे परंतु ती बॅग काढण्यास नकार देत आहे. असे असले तरी ती महिला तिच्या बाजूलाच दिसत आहे. हा काही सेकंदाचा व्हिडीओ आहे पण तो चांगलाच व्हायरल झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी