भरदिवसा आंब्यांची लूट, व्हिडिओ झाला व्हायरल 

Mango loot video: लॉकडाऊन दरम्यान आंब्यांची लूट करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

delhi people loot mangoes in jagatpuri area video goes viral in social media
भरदिवसा आंब्यांची लूट, व्हिडिओ झाला व्हायरल   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी केली आंब्यांची लूट 
  • दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असा घडला प्रकार 
  • आंब्यांची लूट करतानाचा व्हिडिओ सोशळ मीडियात व्हायरल 

नवी दिल्ली: कोरोनाचं संक्रमण आणि लॉकडाऊन यांच्या दरम्यान देशाची राजधानी दिल्लीतून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. या ठिकाणी नागरिकांनी संधी पाहून चक्क आंब्यांची लूट केल्याचं समोर आलं आहे. नागरिकांनी आंब्यांची लूट केल्याने विक्रेत्याचं २० हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. आंब्यांची लूट होतानाची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, नागरिक आंब्यांची लूट करुन पळ काढत आहेत. दिल्लीतील जगतपूरी परिसरात ही घटना घडली आहे.

...आणि सुरू झाली आंब्यांची लूट 

दिल्लीतील जगतपूरी परिसरात आंब्यांची लूट झाल्याची ही घटना समोर आली आहे. ही घटना २० मे रोजी घडल्याचं बोललं जात आहे. या ठिकाणी दुपारच्या सुमारास झाडाच्या सावलीत एक व्यक्ती आंबे विक्री करत होता. त्यावेळी त्या विक्रेत्याचं आणि रिक्षा चालकाचा वाद झाला. या वादामुळे आंबे विक्रेत्याने आपली जागा बदलण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी हा विक्रेता आपल्या फळांच्या पेट्या दुसऱ्या ठिकाणी नेत होता त्यावेळी त्याच्या दोन पेट्या तेथेच राहिल्या. फळ विक्रेता तेथून हलताच क्षणी रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी, ऑटो चालकांनी आणि इतरांनी मिळून ते आंबे पळवले.

 

नागरिकांनी काढला पळ 

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. समोर आलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, नागरिक आंबे चोरून पळ काढत आहेत. काहींनी हातात येतील तितके आंबे उचलले तर काहींनी पिशवीत भरून नेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. फळ विक्रेता आणि इतरांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

 

असा झाला व्हिडिओ व्हायरल 

ज्यावेळी नागरिक आंब्यांची लूट करत होते त्यावेळी तेथे उपस्थितांपैकी काहींनी त्याचा व्हिडिओ शूट केला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करण्यात आला. व्हिडिओत दिसत आहे की, नागरिक धावपळ करत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता तेथे काही काळ ट्रॅफिक सुद्धा जाम झालं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी