मणिपुरच्या तरुणीला कोरोना म्हणून मारली हाक आणि गुटखा थुंकला अंगावर 

भारताची राजधानी दिल्लीत अशीच एक घटना घडली आहे. दिल्लीत राहणारी मणिपूरच्या तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीनं गुटखा थुंकला आणि तिला कोरोना म्हटलं. तरुणीसोबत झालेल्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Manipur girl
तरुणीला 'कोरोना' म्हणून मारली हाक आणि गुटखा थुंकला अंगावर  |  फोटो सौजन्य: Twitter

मणिपूरः संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सगळे एकजुट होत आहेत. या व्हायरसनं देशातही हाहाकार माजवला आहे. जर आता यावर वेळेत नियंत्रण ठेवले नाही तर प्रकरण हाताबाहेर जाऊ शकते. याच दरम्यान लोक एकमेकांना मदत करताना दिसले. पण काही लोकं असेही आहेत जे या महामारीच्या स्थितीही लज्जास्पद कृत्य करत आहेत. भारताची राजधानी दिल्लीत अशीच एक घटना घडली आहे. दिल्लीत राहणारी मणिपूरच्या तरुणीवर एका अज्ञात व्यक्तीनं गुटखा थुंकला आणि तिला कोरोना म्हटलं. तरुणीसोबत झालेल्या या लज्जास्पद घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 500 ओलांडली आहे. याव्यतिरिक्त, मृतांची संख्याही 10 झाली आहे.  भारतातील अनेक राज्ये पूर्णपणे बंद केलीत. हा व्हायरस थांबविण्यासाठी कित्येक पावले उचलली जाताहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एका तरुणीसोबत झालेल्या लज्जास्पद घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना 22 मार्चची आहे. 

उत्तर दिल्लीत राहणारी मणिपुरची तरुणीवर रात्री साडे नऊ वाजता एका व्यक्तीनं गुटखा थुंकला आणि तिला कोरोना म्हणून चिडवलं. या तरुणीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. विजयनगर भागात राहणाऱ्या या तरुणीला या वाईट स्थितीचा सामना करावा लागला. 

आपल्या तक्रारीत तरुणीनं म्हटलं की, स्कूटीवर असलेल्या एका व्यक्तीनं आधी मला बघून कोरोना म्हटलं. त्यानंतर त्यानं माझ्या अंगावर गुटखा थुंकला. यानंतर आरोपी तिथून फरार झाला. ही तरुणी दिल्ली विद्यापीठात एमफिल करत आहे. घटनेच्या दिवशी ती आपल्या पीजीपासून दूर असलेल्या घरातलं सामान आणण्यासाठी गेली होती. कारण आजूबाजूची दुकानं बंद होती. त्याचवेळी ही घटना घडली. 

या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आयपीएस कलम 509 अंतर्गत तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.  सोशल मीडियावर तरुणीसोबत झालेल्या या घटनेचे फोटो व्हायरल होत आहेत. या तरुणीचा फोटो अभिनेता मनिष पॉल याने ट्विट करुन अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांबाबत आपला संताप व्यक्त केला आहे. असं मुर्खासारखं वागण थांबवा. कोरोना व्हायरस  विरोधात ही एकत्र येण्याची वेळ आहे. अशा आशयाचे ट्विट मनिष पॉल याने केलं आहे.  सेलिब्रेटींसह बरेच लोक या तरुणीच्या समर्थनार्थ आणि तिला न्याय देण्यासाठी पुढे आलेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...