Viral: मद्यप्रेमींना दिल्ली पोलिसांनी दिला अनोख्या पद्धतीने इशारा; तुरूंगातील सेवेची दिली माहिती

व्हायरल झालं जी
Updated May 26, 2022 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Delhi Police Post Viral । सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा होत असते. कधी एखाद्या गोष्टीचे कौतुक केले जाते, तर कधी एखादी गोष्ट हासवून जाते. प्रकरण काहीही असो, युजर्स ठरल्याप्रमाणे भन्नाट प्रतिक्रिया देऊन त्या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असतात.

Delhi Police warns alcoholics in a unique way
मद्यप्रेमींना दिल्ली पोलिसांनी दिला अनोख्या पद्धतीने इशारा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा होत असते.
  • दिल्ली पोलिसांची एक मजेदार पोस्ट व्हायरल होत आहे.
  • मद्यप्रेमींना दिल्ली पोलिसांनी दिला अनोख्या पद्धतीने इशारा.

Delhi Police Post Viral । नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चर्चा होत असते. कधी एखाद्या गोष्टीचे कौतुक केले जाते, तर कधी एखादी गोष्ट हासवून जाते. प्रकरण काहीही असो, युजर्स ठरल्याप्रमाणे भन्नाट प्रतिक्रिया देऊन त्या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान आता दिल्ली पोलिसांची एक मजेदार पोस्ट व्हायरल होत आहे, जी पाहून तुम्हीही हसाल आणि इतरांना देखील सांगाल. खर तर दिल्ली पोलिसांनी मद्यप्रेमींबद्दल एक व्यंग्यात्मक ट्विट पोस्ट केले आहे, जे व्हायरल होत आहे. (Delhi Police warns alcoholics in a unique way). 

अधिक वाचा : IAS अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी खेळाडूंची मैदानातून हकालपट्टी

दिल्ली पोलिसांनी 'रूम्स व्हॅकांट' नावाचे एक पॅम्प्लेट ट्विटरवर ट्विट केले आहे. या पोस्टमध्ये दिल्ली पोलिसांनी तुरुंगातील खोल्यांचा उल्लेख केला आहे. फोटो शेअर करत दिल्ली पोलिसांनी लिहिले की, तुम्ही तुमची जागा बुक करा आणि लवकरच ताबा घ्या, तुम्ही लिव्हिंग ऑफरला नक्कीच विरोध करू शकता. पोलिसांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले की रूम सेट शेअरिंग आणि वैयक्तिक आधारावर उपलब्ध आहे. याशिवाय त्या सुविधांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्या तुरुंगाच्या खोल्यांमध्ये दिल्या जातील. जसे की मोफत ब्रेड, अन्न, हवेशीर खोल्या, शेअरिंग बाथरूम. यासोबतच इतर फिचर्सचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या भन्नाट पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

मद्यप्रेमींना दिल्ली पोलिसांनी दिला इशारा

दिल्ली पोलिसांचा हा इशारा अशा लोकांसाठी आहे जे वारंवार दारू पिऊन गोंधळ घालतात आणि कायद्याचे उल्लंघन करतात. आता जे असे कृत्य करताना आढळतील त्यांना या सुविधा लागू होतील. आता ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. काही लोक या पोस्टचे समर्थन करत आहेत, तर काही लोक त्याचा प्रचंड आनंद घेत आहेत. मात्र मद्यप्रेमींना याचा चांगलाच ठसका बसणार आहे हे नक्की. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी