डिलिव्हरी बॉयची नोकरी घड्याळ्याच्या काट्यावर; जीव मुठीत घेऊन करावं लागतं काम

व्हायरल झालं जी
Updated Mar 20, 2023 | 17:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Delivery Boy's Job: होळीचा सण हा रंगाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो. मात्र होळीदिवशीच नोएडामध्ये 2 युवकांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचे.

2 delivery boy accident in Delhi
v  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घडाळ्याच्या काट्यावर धावतं डिलिव्हरी बॉयचं आयुष्य
  • डिलिव्हरी बॉईजची नोकरी धोक्याची घंटा
  • अन्यथा नोकरीही जाईल आणि दंडही भरावा लागणार

होळीचा सण हा रंगाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो. मात्र होळीदिवशीच नोएडामध्ये 2 युवकांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचे. होळीदिवशी कामावर जाताना दोन्ही तरुणांना कारने धडक दिली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बंटी आणि दीपक अशी या दोन युवकांची नावं आहेत. 

पोलिसांनी सांगितलं की, बंटी नोएडामध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो पार्थळा सेक्टर-112 सर्व्हिस रोडवर येताच एका अज्ञात वाहनचालकानं बंटीच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दुसऱ्या घटनेत, सेक्टर 39 पोलीस स्टेशन हद्दीतील सालारपूरमध्ये राहणारा दीपक बिग बास्केटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. होळीदिवशी तो त्याच्या स्कूटीवरून लोटस बुलेवर्डला डिलिव्हरी करण्यासाठी जात होता. त्याचवेळी दुपारच्या सुमारास लोटस वेल्वेटच्या गेट क्रमांक 1 जवळ एका होंडा कारने त्याच्या स्कूटीला धडक दिली. 

घटनास्थळी उपस्थित लोकांनी दीपकला निठारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. मात्र डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केलं. सेक्टर 39 पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय चेहर यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दीपकचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपी कार चालकालाही ताब्यात घेतलं. 

अधिक वाचा: Viral Video : युवकाचा देसी जुगाड... अवघ्या 30 रुपयांत 100 किमी पळवली Tata Nano कार

घडाळ्याच्या काट्यावर धावतं डिलिव्हरी बॉयचं आयुष्य 

दरम्यान,  अशा वाढत्या अपघातांमुळे डिलिव्हरी क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे आणि डिलिव्हरी बॉयचं काम 24 तास सुरुच असल्याचं दिसून येतं. सद्यस्थितीमध्ये अशी अनेक अ‍ॅप्स आहेत ज्यांनी अवघ्या 10 मिनिटांत डिलिव्हरी अशी संकल्पना आणली आहे. यामुळे डिलिव्हरी बॉईज जास्तीत जास्त जोखीम पत्करताना दिसतात. 

नियमांचे पालन होणार नाही

डिलिव्हरी पोहचवताना कंपनी आणि अ‍ॅपच्या डिलिव्हरी बॉयवर इतका दबाव असतो की तो स्पीडमध्ये नियम न पाळता गाडी चालवतो. त्यामुळे अपघात होणं ही गोष्ट साहजिक आहे. याशिवाय डिलिव्हरी बॉयच्या गाडीवरील सामानचं वजन आणि स्पीड यामुळे वाहनाचा बॅलेंस जातो आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. 

अधिक वाचा:  अजब लग्नाची गजब गोष्ट! दोन बायकांनी नवऱ्याला 3-3 दिवस घेतलं वाटून आणि सातव्या दिवशी...

15 ते 16 तास लॉगिन ठेवल्यास अवघे 750 रुपये मिळतात

फुड अ‍ॅप बेस कंपनीत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणारे बाळ गोविंद मिश्रा म्हणाले की, 15 मार्चला त्यांनी नोएडाच्या 104 वरून रेस्टॉरंटचा रेकॉर्डर उचलला, त्याचवेळी त्यांना त्यांच्या घरून फोन आला की त्यांची मुलगी खूप आजारी आहे आणि तिला पोटदुखीचा त्रास होत आहे. अशा परिस्थितीत, डिलिव्हरीपूर्वी त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी पोहोचल्यावर त्यांनी तिथून आपल्या फूड अ‍ॅपच्या कस्टमर केअरला फोन केला आणि दुसर्‍याने डिलिव्हरी करावी अशी विनंती केली. 

कामगार न्यायालयात दाद

परंतु कंपनीने ही डिलिव्हरी मिश्रा यांनाच करणं भाग आहे असे सांगितले. तसंच डिलिव्हरी न केल्यास दंड आकारला जाण्याचा इशारा दिला. यावर मिश्रांनी डिलिव्हरी करण्यास नकार दिल्यानं त्यांना कंपनीने दुप्पट दंड ठोठावला. या प्रकरणी त्यांनी आता कामगार न्यायालयात दाद मागितली आहे, पण अद्यापपर्यंत त्यावर सुनावणी झालेली नाही. 

अधिक वाचा: lion and buffalo fight: एकटी म्हैस बघून सिंहांच्या कळपाने केला हल्ला; पण कहानी में है ट्विस्ट...

बाल गोविंद मिश्रा यांनी सांगितले की, जेव्हा ते लोक 10 तास लॉगिन करतात, तेव्हा केवळं 500 रुपयांचं काम होतं आणि त्यांना कंपनीकडून 200 रुपये मिळतात. 15 ते 16 तास login ठेवल्यावर 750 रुपयांच्या आसपास काम होतं आणि त्यांना 350 रुपये मिळतात.

...अन्यथा नोकरीही जाईल आणि दंड सुद्धा 

मिश्रांच्या मते अनेकदा रेस्टॉरंट्सवाले डिलिव्हरी तयार असल्याचं अ‍ॅपवर सांगतात. मात्र  डिलिव्हरी बॉय तिथं पोहोचल्यावर ऑर्डर तयार नसते. त्यामुळे त्याला बराच वेळ थांबावे लागतं. पण यातही डिलिव्हरी बॉयलाच वारंवार नोटीस दिली जाते, त्यांनी सांगितले की, सध्या डिलिव्हरी बॉयची अवस्था अत्यंत बिकट असून, त्याला काम करायचे असेल तर हातावरचं घड्याळाचे बघून चालावं लागेल, अन्यथा नोकरीही जाईल आणि दंडही होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी