‘लुंगी’ घातली म्हणून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला, संतापलेल्या व्यक्तीचं धरणं आंदोलन

व्हायरल झालं जी
Updated Jul 19, 2019 | 18:43 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

केरळच्या कोझिकोडमध्ये एका व्यक्तीला रेस्टॉरंटमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. यामागचं कारण ऐकून आपल्यालाही धक्का बसेल. त्या व्यक्तीनं लुंगी घातली होती म्हणून त्याला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला.

Kerala
‘लूंगी’ घातली म्हणून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • लुंगी घातली म्हणून रेस्टॉरंटमध्ये करीम या तरुणाला प्रवेश नाकारला
  • संतापलेल्या तरुणाचं हॉटेलबाहेर धरणं आंदोलन
  • संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद, करीम दारूच्या नशेत असल्याचा हॉटेल अधिकाऱ्यांचा आरोप
  • फॅमिली रेस्टॉरंट असल्यामुळे तिथं लुंगी घालून येण्यास बंदी, हॉटेलचा तसा नियम

Denied entry into restaurant for wearing lungi: केरळमध्ये एक विचार करायला लावणारी घटना घडलीय. तिथं एका तरुणानं लुंगी घातली होती म्हणून त्याला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. हे प्रकरण केरळच्या कोझिकोडमधील हॉटेल सी क्वीनमधील आहे. या व्यक्तीचं नावं करीम चेलेमबरा असं सांगण्यात येतंय. त्यानं सांगितलं की, सोमवारी रात्री हॉटेलच्या टेरेसवरील रेस्टॉरंटमध्ये आपल्या मित्रांसोबत तो जेवण्यासाठी गेला होता. मात्र त्यानं जसं रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी पाऊल ठेवलं. तेव्हा तिथं असलेल्या रेस्टॉरंट कर्मचाऱ्यानं त्याला बाहेरचं थांबवलं, कारण त्यानं लूंगी घातली होती.

जेव्हा करीमनं कर्मचाऱ्याच्या या वागणुकीचा विरोध केला तेव्हा कर्मचाऱ्यानं सांगितलं की, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये लुंगी घालून येण्यास परवानगी नाहीय. यावर करीम तापला आणि त्यानं कर्मचाऱ्यांना असा नियम कुठे लिहिलाय याबाबत विचारलं. लुंगी घालून कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाता येत नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही. यावर त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेलं लेखी उत्तर दाखवलं. करीमनं याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

एवढंच नाही तर करीमनं पोलिसांना सांगितलं की, त्यानं रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांना लुंगी काढून आपण अंडरवेअरवर आत जावू शकतो का, हे विचारलं. तेव्हा कर्मचाऱ्यांनी परवानगी दिली. पण त्यानं खरंच जेव्हा लुंगी काढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवलं.

करीमनं पोलिसांना विचारलं की, आता आपल्याला काय घालून जायचं हे सुद्धा यांना विचारावं लागेल का? करीमनं हॉटेल बाहेर या घटनेचा विरोध करत धरणं आंदोलन पण केलं होतं. एवढंच नाही तर त्यावेळी करीमच्या सोबत अनेक लोकंही पुढे आले होते. करीमसोबतशाजिल थमारासेरी, ओपी रविंद्रन आणि अब्दुल मजीद हे या धरणं आंदोलनात पुढे आले.

हॉटेल अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, आमच्या हॉटेलमध्ये लुंगी घालून येण्यावर बंदी आहे. कारण इथं सगळे फॅमिली घेऊन येत असतात. तसंच करीम दारूच्या नशेत होता आणि आमच्या नियमांबद्दल सांगितल्यावर त्यानं कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली, असंही हॉटेलच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

हॉटेल अधिकाऱ्यांनी करीमला स्पष्टपणे सांगितलं की, आमचे आणखी दोन बार आहेत. तिथे अशाप्रकारचा कुठलाही नियम नाही. मात्र इथे सर्व लोक आपल्या कुटुंबासोबत येतात त्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये हा नियम आहे. सर्व प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय, आपण ते पाहू शकता असं हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
‘लुंगी’ घातली म्हणून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला, संतापलेल्या व्यक्तीचं धरणं आंदोलन Description: केरळच्या कोझिकोडमध्ये एका व्यक्तीला रेस्टॉरंटमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. यामागचं कारण ऐकून आपल्यालाही धक्का बसेल. त्या व्यक्तीनं लुंगी घातली होती म्हणून त्याला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...