‘या’ पंतप्रधानांना तिसऱ्यांदा रद्द करावं लागलं आपलं लग्न, कोरोना नाही ‘हे’ ठरलं कारण

Denmark's PM Mette Frederiksen: डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडेरिक्सन यांचं लग्न तिसऱ्यांदा रद्द करण्यात आलंय. लग्न रद्द करण्याचं कारण कोरोना नही तर युरोपीय काऊसिंलची बैठक आहे. जाणून घ्या याबाबत...

Mette Frederiksen
पंतप्रधानांनी पुढे ढकललं लग्न  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा पुढे ढकललं आपलं लग्न
  • जुलै महिन्यात होणाऱ्या युरोपीय संघाच्या बैठकीसाठी मेटे फ्रेडेरिक्सन यांनी लग्न पुढे ढकललं
  • ही बैठक संपल्यानंतर लवकरच लग्न करणार असल्याची मेटे यांनी दिली माहिती

नवी दिल्ली: कुठल्याही सामान्य व्यक्तीचं लग्न टाळलं गेलं किंवा तात्पुरतं पुढे ढकलण्यात आलं तर ही कोणती मोठी गोष्ट नसते. पण कुठल्याही देशाच्या प्रमुखाचं लग्न जर वारंवार पुढे ढकललं जात असेल तर, तो चर्चेचा विषय बनतो. डेन्मार्कच्या (Denmark) पंतप्रधान मेटे फ्रेडेरिक्सन सोबत मागील काही काळापासून असंच होत आहे. फ्रेडेरिक्सन यांच्या लग्नाची (Marriage Date) तारीख ठरलेली होती. मात्र त्यांना आता तिसऱ्यांदा आपलं लग्न पुढे ढकलावं लागलं आहे, असं करण्याचं कारण कोरोनाचं संकट नाही तर युरोपीय देशांची बैठक आहे. सर्व युरोपीय संघाच्या बैठकीसाठी डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी आपलं लग्न पुढे ढकललं आहे. याची माहिती स्वत: पंतप्रधान (PM Mette Frederiksen) फ्रेडेरिक्सन यांनी गुरूवारी दिली आहे.

बैठकीसाठी पुढे ढकलावं लागलं लग्न

कोरोना संकटाच्या काळात जगभरातील लोकांचे लग्न पुढे ढकलले गेले. मात्र काही असे जोडपे पण आहेत, ज्यांनी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करत लॉकडाऊनमध्ये लग्न केलं. फ्रेडेरिक्सन यांनी आपलं लग्न पुढे ढकलल्याची माहिती फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांनी त्यांचा व त्यांच्या होणाऱ्या पतीचा बो टेंगबर्ग यांचा एक फोटो सोशल मीडिया वर पोस्ट करत लिहिलं, ‘मी खरंतर या सुंदर व्यक्तीसोबत लग्न करणार होती.’ फ्रेडेरिक्सन यांनी पुढे लिहिलं, ‘सध्या हे इतकं सोपं नाहीय.ब्रसेल्समध्ये काऊंसिलची बैठक बोलावण्यात आलीय आणि ही बैठक जुलैमध्ये शनिवारी त्याच दिवशी आहे ज्या दिवशी आमचं लग्न होणार होतं.’

https://www.facebook.com/mettefrederiksen.dk/photos/a.175998657718/10158284078292719/

‘मला डेन्मार्कच्या हिताचा विचार करावा लागणार आहे’

डेन्मार्कच्या पंतप्रधान पुढे म्हणाल्या, ‘मला माझं काम करायचं आहे आणि डेन्मार्कचं हित लक्षात घेता. माझं लग्न पुढे ढकलावं लागत आहे. मात्र आम्ही लवकरच लग्न करू. मी बो यांना लग्नासाठी होकार देणार आहे. त्यांनी खूप वाट बघितली आहे.’

बैठकीत कोविड-१९ सोबत लढा देण्यावर होणार चर्चा

युरोपीय काऊंसिलची बैठक १७-१८ जुलैला असणार आहे. या बैठकीमध्ये युरोपीय संघाचे सर्व २७ देशांचे प्रमुख सहभागी होतील. या बैठकीबाबतचा निर्णय गेल्या आठवड्यात एका वर्च्युअल बैठकीद्वारे घेतला गेला. विशेष बाब ही आहे की, कोरोना संकटाच्या काळात हे सर्व नेते पहिल्यांदा एकत्र उपस्थित राहणार आहे. सांगितलं जातंय की, या बैठकीमध्ये २७ देशांचे नेते कोविड-१९च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी रणनिती आणि युरोपीय संघाचं नवीन बजेटवर चर्चा करणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी