तिरुपती बालाजी मंदिराला भाविकाने दान केली 4 कोटी रुपयांची साडेसहा किलो वजनी सोन्याची तलवार

आंध्र प्रदेशाच्या (Andhra Pradesh) चित्तूर (Chittoor district) जिल्ह्यात असलेल्या तिरुमलच्या (Tirumal) डोंगरावर असलेलं श्री. वेंकटेश्वर मंदिर (shree Venkateswara Temple) एक प्रसिद्ध देवस्थान आहे.

gold sword to Tirupati Balaji Temple
भाविकाने दान केली 4 कोटी रुपयांची साडेसहा किलो वजनी सोन्याची तलवार  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • तिरुपती श्रीवेंकटेश्वर मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे.
  • तलवार दान करणारे श्रीनिवासन दाम्पत्य हे हैद्रराबाद येथील आहे.
  • यापुर्वीही तमिळनाडूच्या टेनीतील प्रसिद्ध कपडे व्यापारी थंगा दोराई यांनी 2018 सोन्याची तलवार दिली होती.

चित्तूर : आंध्र प्रदेशाच्या (Andhra Pradesh) चित्तूर (Chittoor district) जिल्ह्यात असलेल्या तिरुमलच्या (Tirumal) डोंगरावर असलेलं श्री. वेंकटेश्वर मंदिर (shree Venkateswara Temple) एक प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे हजारो भाविक रोज दर्शनाला येतात. तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji Temple) दररोज भाविक कोट्यवधी रुपयांचे दान देत असतात. यामुळे या देवाची गणना श्रीमंत देवस्थान किंवा देव अशी केली जाते. तिरुपती श्रीवेंकटेश्वर मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे.  या प्रसिद्ध मंदिरात दररोज 50 हजारांहून अधिक भाविक येत असतात. त्यामुळे मंदिराला दान स्वरुपात 1000  कोटी ते  1200 कोटी रुपये दर वर्षाला मिळतात. 

सोमवारीही अशाच एका दानशूर दाम्पत्याने कोट्यवधी रुपयांची तलवार तिरुपती बालाजी मंदिराला दान केली आहे. तलवार दान करणारे श्रीनिवासन दाम्पत्य हे हैद्रराबाद येथील असून त्यांनी 4 कोटी रुपयांची एक सोन्याची तलवार मंदिरात दान केली आहे.  श्रीनिवासन  दाम्पत्याने सोमवारी सकाळी तिरुमाला तिरुपती मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे  ही तलवार सोपवली आहे. श्रीनिवास दाम्पत्याने रविवारी तिरुमालाच्या कलेक्टिव गेस्ट हाऊसमध्ये मीडियासमोर साडेसहा किलोग्रॅमची सोन्याची तलवार दाखवली.

श्रीनिवासन यांना गेल्यावर्षांपासून ही तलवार दान करायची होती. पण कोरोनामुळे ते जमू शकले नाही. भगवान वेंकटेश्वर स्वामी यांच्या चरणी सोन्याची तलवार अर्पण करणारे श्रीनिवास म्हणाले की, 'गेल्या वर्षभरापासून मला सोन्याची तलवार सूर्य कटारी दान करायची होती. पण कोरोनामुळे  मंदिर बंद होतं, ते आज सकाळी शक्य झाले'. 

दान करण्यात आलेल्या तलवारीला तयार करण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. त्यावेळी या साडेसहा किलोग्रॅमची तलवारची किंमत साधरण 1.8 कोटी रुपये इतकी होती. आता या तलवारीची किंमत 4 कोटी रुपये आहे.  यापुर्वीही तमिळनाडूच्या टेनीतील प्रसिद्ध कपडे व्यापारी थंगा दोराई यांनी 2018 मध्ये तिरुपती मंदिरात 1.75 कोटी रुपयांची सोन्याची तलवार दान केील होती. ही तलवार तयार करण्यास सहा किलो सोनं लागलं होतं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी