[video] लांब  आणि जाड टॉवेल गिळला अजगराने, अथक प्रयत्नांनी डॉक्टरांना काढला 

अजगराच्या पोटात समुद्र किनारी वापरण्यात येणारा टॉवेल काढण्यात आला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्लास्टिक आणि कचरा गिळण्याचे प्रकार पाय असलेल्या जनावरांमध्ये पाहयला मिळते. 

doctors pull entire beach towel out of pythons mouth in australia video viral news in marathi tvirl 55
[video] लांब  आणि जाड टॉवेल गिळला अजगराने, अथक प्रयत्नांनी डॉक्टरांना काढला   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अजगराने गिळला टॉवेल
  • अजगर हा पाळीव असून त्याचे नाव मॉन्टी आहे
  • अजगराच्या पोटातून टॉवल काढण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

नवी दिल्ली :  प्लास्टिक किंवा कचरा माणसासाठी नाही तर जनावरांसाठीही खतरनाक बनला आहे. त्याचे एक उदाहरण ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाले. येथील एका रुग्णालयात एका विशालकाय पाळीव अजगराच्या पोटातून एक लांब आणि जाड टॉवल काढण्यात आला. लोकांना हे दृश्य पाहून आश्चर्य वाटत आहे.  प्लास्टिक आणि कचरा गिळण्याचे प्रकार पाय असलेल्या जनावरांमध्ये पाहयला मिळते.  पण अजगराने टॉवल गिळल्याचा प्रकार हा पहिल्यांदा पाहण्यात आला आहे. 

मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या सापाचे नाव मॉन्टी सांगण्यात येत आहे. या मादी अजगराचे वजन ११ पाऊंड आणि लांबी १० फूट आहे. रिपोर्टनुसार मॉन्टी नावाच्या अजगराने समुद्र किनारी वापरण्यात येणारा टॉवेल गिळला. 

त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या पोटातून हा टॉवेल काढला. पण त्याला हा टॉवले काढण्यापूर्वी बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक हा टॉवेल बाहेर काढण्यात आला आणि त्याचे प्राण वाचविण्यात आले. एवियन अँड एक्जॉटिक विभागाच्या डॉ. ऑलिव्हिया यांनी या अजगराचा इलाज केला. 

डॉक्टरांनी सांगितले की, मॉन्टीच्या पोटातून हा टॉवेल काढण्यात आला नसता तर तो मरण पावला असता. अजगराचा इलाज केल्यानंतर त्याला हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी