बायको नांदायला येत नसल्यानं शंभर फुट उंच मोबाईल टॉवरवर चढला दारुड्या गणपत, लोकांना आली शोलेची आठवण

जोडप्यांमध्ये (couples) अनेकदा वाद आणि भांडणे (quarrel) होत असतात आणि हे आता लोकांसाठी सामान्य झाले आहे, परंतु हे वादविवाद इतके वाढतात की अनेकजण आत्महत्या (suicide) करत असतात. परंतु अनेक जोडप्यांना आपले प्रश्न बोलून सोडवायचे असतात, पण काही लोक असेही असतात जे वाद सोडवण्यासाठी विचित्र पद्धतींचा अवलंब करतात. त्यामुळे त्याची समस्या सुटण्याऐवजी वाढत जाते.

Drunk Ganpat climbed a hundred feet high mobile tower for wife
बायको नांदायला येत नसल्यानं दारुड्यानं सर केला मोबाईल टॉवर  |  फोटो सौजन्य: Indiatimes, Representative Image
थोडं पण कामाचं
  • बायकोला माहेरवरुन परत घरी बोलविण्यासाठी नवरोबा थेट मोबाईल टॉवरवर चढला होता.
  • महाराष्ट्रातील जालना जिल्ह्याती बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावात घडली.

Drunk Man Climbs 100-Ft Tall Mobile Tower In Maharashtra: जोडप्यांमध्ये (couples) अनेकदा वाद आणि भांडणे (quarrel) होत असतात आणि हे आता लोकांसाठी सामान्य झाले आहे, परंतु हे वादविवाद इतके वाढतात की अनेकजण आत्महत्या (suicide) करत असतात. परंतु अनेक जोडप्यांना आपले प्रश्न बोलून सोडवायचे असतात, पण काही लोक असेही असतात जे वाद सोडवण्यासाठी विचित्र पद्धतींचा अवलंब करतात. त्यामुळे त्याची समस्या सुटण्याऐवजी वाढत जाते.

त्यात  जर बायको रुसली तर तिला प्रेमी शब्दात पटवता आले तर बरं नाहीतर काही जण तरी वेगळं करुन जात असतात. अशा लोकांची विचारसरणीही खूप वेगळी असते. पत्नीचे मन वळवण्यासाठी ते अशी कृत्ये करतात, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. असाच एक प्रकार जालनामध्ये घडलाय. बायकोला माहेरवरुन परत घरी बोलविण्यासाठी नवरोबा थेट मोबाईल टॉवरवर चढला होता. बायको घरी नेण्यासाठी टॉवरवर चढणाऱ्या या अवलिया व्यक्तीचं नाव गणपत बकाल असं आहे. 

Read Also :सासरच्यांना नको होती मुलगी; डॉक्टरनं कापून बाहेर काढला गर्भ

दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला

महाराष्ट्रातील जालना जिल्ह्याती बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावात घडली. या गावातील गणपत दारूच्या नशेत थेट 100 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला. आता तुम्ही विचार करत असाल की यामागे काय कारण? वास्तविक, त्या गणपतची पत्नी रागावून तिच्या माहेरच्या घरी गेली आणि तिने परत येण्यास नकार दिला. अनेकवेळा समजावूनही त्या व्यक्तीची पत्नी घरी परतली नाही, तेव्हा त्याने 100 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढण्याचा निर्णय घेतला आणि जोपर्यंत पत्नी सासरी येण्यास तयार होत नाही तोपर्यंत आपण टॉवरवरून खाली उतरणार नाही, असा निर्धार केला. 

Read Also : अजित पवार राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

बायको माहेरावरुन सासरी यावी म्हणून नवरा बनला विरु

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावकरी, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचार्‍यांनी घरगुती वाद सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्यानंतर गणपत बकाल नावाचा एक व्यक्ती खाली आला. ही घटना बदनापूर तालुक्यातील दाभाडी गावातील आहे. पोलीस अधिकारी म्हणाले, 'तो दारूच्या नशेत होता.

चार तासांनी तो टॉवरवरून खाली आला. त्याला ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. गणपत चार तास टॉवरवर बसून होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या दृश्याने त्यांना 1970 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'शोले' मधील धर्मेंद्रच्या पात्राच्या मद्यधुंद अभिनयाची आठवण करून दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी