Girl jumped from balcony: नशेच्या गर्तेत बाल्कनीतून मारली उडी, व्हिडिओ पाहून येईल अंगावर काटा

स्टंट करण्याच्या नादात एका तरुणीने बाल्कनीतून पाठीमागे उडी मारली आणि ती जमिनीवर आपटल्याचे या व्हिडिओत दिसते. नशेच्या अंमलाखाली असताना आपली विचारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आपण काय करत आहोत, याचे अनेकांना भान राहत नाही.

Girl jumped from balcony
नशेच्या गर्तेत बाल्कनीतून मारली उडी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • तरुणीने नशेच्या धुंदीत मारली उडी
  • आत्मघाती उडीने तरुणी गंभीर जखमी
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Girl jumped from balcony: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. त्यातील काही मजेशीर असतात, तर काही गंभीर असतात. रोज अपलोड होणाऱ्या लाखो व्हिडिओतून काही ठराविक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ गंभीर आणि धक्कादायक आहे. स्टंट (Stunt) करण्याच्या नादात एका तरुणीने बाल्कनीतून पाठीमागे उडी मारली आणि ती जमिनीवर आपटल्याचे या व्हिडिओत दिसते. नशेच्या अंमलाखाली असताना आपली विचारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आपण काय करत आहोत, याचे अनेकांना भान राहत नाही. याचाच प्रत्यय व्हिडिओतील घटना पाहून येतो. 

तरुणीने मारली उडी

सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर होत असलेल्या या व्हिडिओत एक तरुणी आपल्या बाल्कनीत उभी असल्याचं दिसतं. खाली काही लोक उभे आहेत आणि ते एकमेकांशी चर्चा करत असल्याचं दिसतं. त्यावेळी नशेच्या आहारी गेलेली एक तरुणी बाल्कनीच्या काठावर उभी राहिल्याचं दिसतं. ही तरुणी आता कठडा पार करून पुढे येईल, अशीच सर्वांची अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात हे घडतच नाही. तरुणी कठड्यावरील आपला हात सोडून देते आणि खाली कोसळते. काही क्षणातच ती खाली पडते आणि तिथे उभे असणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसतो.

अधिक वाचा - Viral Video: लग्न मंडपात नववधू अन् नवरदेवाने केलं असं काही की... पाहून सर्वच झाले अवाक्

वाचवण्याचा प्रयत्न

या तरुणीला उडी मारताना पाहून गर्दीतील काहीजण सावध होतात आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा प्रयत्न यशस्वी होत नाही. लोकांना तिला पकडण्यात यश येत नाही. ती गर्दीतून जोरदार वेगाने खाली पडते आणि थेट जमिनीवर आपटते. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र ज्या प्रकारे ही तरुणी खाली आपटली, त्यानंतर तिला गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कदाचित, या तरुणीने आपला जीवही गमावला असेल, अशीही चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या तरुणीने असा निर्णय घेण्यामागे काही गंभीर कारण असेल की केवळ नशेच्या आहारी गेल्यामुळेच तिने हे कृत्य केले असावे, याचाही तर्क लावण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. 

अधिक वाचा - VIRAL VIDEO: धावत्या कारच्या छतावर फटाके फोडले अन् पोलिसांनी पकडताच कान पकडून उठाबशा काढू लागले

भयंकर व्हिडिओ

या तरुणीच्या समोर उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं दिसतं. या व्यक्तीला तरुणी उडी मारणार असल्याची कल्पना होती की नाही, याचीदेखील चर्चा रंगली आहे. तरुणीने घेतलेल्या या आत्मघातकी निर्णयावर अनेकजण टीका करत आहेत. कुठल्याही छोट्या किंवा मोठ्या कारणासाठी आपलं आयुष्य संपवणं किंवा धोक्यात घालणं योग्य नसल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ एकमेकांना फॉर्वर्ड केला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी